Maharashtra politics : मोठी बातमी! बडा मासा मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आठवलेंचंही टेन्शन वाढलं

Last Updated:

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

News18
News18
अहमदनगर, हरिष दिमोटे, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
2019 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लढवली. आता भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे या मतदारसंघावर रामदास आठवले यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे, दुसरीकडे रामदास आठवले यांनी देखील दावा केला आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे, त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी शिवसेना देखील आग्रही आहे. सदाशिव लोखंडे हे सध्या शिर्डीचे खासदार आहेत, मात्र त्यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता शिर्डीमधून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Maharashtra politics : मोठी बातमी! बडा मासा मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आठवलेंचंही टेन्शन वाढलं
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement