Jitendra Awhad : आव्हाडांच्या अडचणीत वाढ, पुण्यानंतर शिर्डीतही गुन्हा दाखल; श्रीरामांवरचं वक्तव्य भोवलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
शिर्डी, (हरिष दिमोटे, प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यानंतर शिर्डीतही गुन्हा दाखल झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपनं काल आंदोलन केलं होतं. यावेळी धीरज घाटे यांनी विश्रामबाग पोलिसांकडं आव्हाडांविरोधात तक्रार दिली होती. यावरुन कलम 295 अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील वक्तव्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पाठोपाठ शिर्डीत कलम 295 A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं आव्हाड यांच्यावर कालपासून टीकेला सामोरं जावं लागतं आहे. आव्हाड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले होते की, "तुम्ही इतिहास वाचत नाही, मनात ठेवत नाही, राजकारणात आपण वाहत जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम आमचा आहे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला चाललात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि त्यामुळं मटणही खातो. हा रामाचा आदर्श आहे राम शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहार शोधायला कुठं जाणार?" असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं.
advertisement
आव्हाडांनी दिले पुरावे
जितेंद्र आव्हाड म्हणाले, की ग.दी.माडगुळकर ह्यांच्या गीत रामायणातील पंक्ती पुढीलप्रमाणे आहेत.
जानकिसाठीं लतिका, कलिका | तुझिया माझ्या भक्ष्य सायकां, ||
उभय लाभले वनांत एका | पोंचलों येथ ती शुभचि घटी ||
- गीत रामायण (या इथे लक्ष्मणा बांध कुटी)
वाचा - पुण्यात भाजप आमदाराची अजित पवारांसमोर पोलिसाला मारहाण; आता म्हणतात, फक्त बाजूला ढकललं
अर्थ - जानकीला फुले, कळ्या (केसात माळण्यासाठी, वेणी-गजरा करण्यासाठी इ.) आणि तुला-मला शिकार करून खाण्यासाठी शिकार या एकाच वनात उपलब्ध आहे, असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणांना सांगत आहेत.
advertisement
प्रल्हाद केशव अत्रे ,रामायणातील अनेक लोकांनी आपले मत मांडली आहे. 300 लोकांनी रामायण लिहिले आहे. राम हा प्रेमळ होता. शबरीची बोर खाणारा राम होता. भरतने रामच्या पादुका तिथेच ठेवल्या होत्या. मात्र, आजच्या राजकारणातील लोक पादुका फेकून बसणारे आहे. बहुजनाचा राम, तो क्षत्रिय आहे. मी काय चुकीचा बोललो? विचारांवर माझ्यासमोर बोला. मी चूप चाप होतो. असे अनेक पुरावे आहेत.
view commentsLocation :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
January 05, 2024 7:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Jitendra Awhad : आव्हाडांच्या अडचणीत वाढ, पुण्यानंतर शिर्डीतही गुन्हा दाखल; श्रीरामांवरचं वक्तव्य भोवलं


