Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर...; हेड कॉन्स्टेबलच्या पत्राने पोलीस दलात खळबळ
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दोन दिवसांच्या आत प्रमोशन यादीत बदल न केल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेल असं पत्र पोलीस हेड कॉन्स्टेबलने लिहिलं आहे.
साहेबराव कोकणे, अहमदनगर, 14 डिसेंबर : पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत दोन दिवसात पदोन्नतीची यादी न बदलल्यास आत्महत्या करेन अशा हेड कॉन्स्टेबलच्या पत्राने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या रामनाथ भाबड या हेड कॉन्स्टेबलने आत्महत्या करणार असल्याचे निवेदन दिले आहे. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचं पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये रामनाथ भाबड हे हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत.
पोलिस हेड कॉन्स्टेबलने लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, दोन दिवसांच्या आत प्रमोशन यादीत बदल न केल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेल. पोलीस कर्मचाऱ्याने हे पत्र पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरिक्षक आणि पोलीस अधीक्षकांना पाठवलं आहे. पत्राचा फोटो आता व्हायरल होत आहे.
Crime : हुंड्यात दिली नाही बुलेट, पतीसह सासरच्यांनी गाठली क्रौर्याची परिसीमा; महिलेचा मृतदेह सापडेना
advertisement
पत्रात म्हटलं की, पदोन्नती करताना पक्षपातीपणा, भ्रष्टाचार झाला आहे. पदोन्नती मार्कांनुसार आणि सेवाज्येष्ठतेनुसार झाल्याचं दिसून येत नाही. यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार केल्यासारखं दिसत आहे. त्यामुळे दोन दिवसांत्या आत मार्कानुसार आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न काढल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेन. याची जबाबदारी अहमदनरच्या पोलीस अधीक्षकांची राहिल असंही पत्रात म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2023 12:39 PM IST
मराठी बातम्या/अहमदनगर/
Police News : दोन दिवसात प्रमोशन द्या नाहीतर...; हेड कॉन्स्टेबलच्या पत्राने पोलीस दलात खळबळ


