Jayakwadi Solar Project : जायकवाडी सौरऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा तापणार? स्थानिकांचा तीव्र विरोध, म्हणाले प्रकल्प रेटला तर..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jayakwadi Solar Project : जायकवाडी जलाशयात होऊ घातलेल्या तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचा घाट कशासाठी आणि कोणासाठी असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर, 10 डिसेंबर (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नाथसागर जलाशयात शासनाकडून उभारण्यात येणाऱ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पास मच्छीमार बांधवांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असताना प्रकल्पाला मंजुरी मिळाली कशी? जायकवाडी जलाशयात होऊ घातलेल्या तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचा घाट कशासाठी आणि कोणासाठी असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांचा विचारला आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत जायकवाडी जलाशयावर तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी आणि जायकवाडी धरणाखालील जायकवाडी वसाहत नाथनगर, पैठण वसाहतीतील कतपूर येथे पुलिंग स्टेशन उभारणीसाठीचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. सदरील प्रकल्पासाठी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केंद्रशासन अंगीकृत कंपनीस तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी आणि पर्यावरण विषयक आणि इतर वैधानिक मान्यता घेऊन प्रकल्प उभारणीचे आदेश देण्यात आलेले आहेत. जायकवाडी जलाशयाचे संपूर्ण क्षेत्र संचय पातळीपर्यंत पक्षी अभयारण्य घोषित झालेले आहे. तसेच या पुढील पाचशे मीटर अंतरापर्यंत क्षेत्र इकोसेन्सिटिव्ह झोन अंतर्गत समाविष्ट झालेले आहेत, अशा ठिकाणी कोणत्याच प्रकारचे प्रकल्प उभारता येत नाहीत, कोणतेही बांधकाम करता येत नाही, पक्षी अधिवासात त्रासदायक होतील अशा असणाऱ्या करण्यास कायद्याने बंधन घातलेले आहे, याला स्थानिक मच्छीमार आणि शेतकऱ्यांनी विरोध केला आहे,
advertisement
परिसरातील जैवविविधता नष्ट होईल..
जैवविविधतेवर बाधा असणारे प्रकल्प अशा क्षेत्रात उभारता येत नाहीत. प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाच्या आच्छादनामुळे पाण्यातील जलचरास ऑक्सिजन मिळणार नाही, पाणी प्रदूषित होईल, पाण्यातील वनस्पती वाढणार नाही, वनसंपदेवर परिणाम होऊ शकतो, पक्षी आणि पाण्यातील मासे इतर जलचर साखळीवर परिणाम होऊन मासे आणि पक्षी अभयारण्य असून ही पक्षी मरतील. जायकवाडी जलाशयावर अनेकांचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यातून संबंधितांवर उपासमारीची वेळ येणार आहे. संबंधित प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प अनाधिकृत असून आणि शासनाच्या नियमांना पायदळी तूडवण्याबरोबरच वन्यजीव संरक्षण कायदा, इकोसेन्सिटिव्ह झोन याचाही विचार केलेला नाही. या प्रकल्पा विरोधात छत्रपती संभाजीनगर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील मच्छीवार बांधवांनी मोठा विरोध दर्शवला आहे.
advertisement
खा. सुजय विखे यांचं समर्थन
view commentsमात्र याउलट तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अतिरिक्त पाणी पिण्यासाठी मिळेल. त्यामुळे कुणाचंही नुकसान होणार नाही. म्हणून अहमदनगर येथील मुरडॅमवरही अशा प्रकारे तरंगता सौर प्रकल्प उभारणार असल्याचं खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितलं. मुळा धरण आणि जायकवाडी प्रकल्प यामध्ये फरक आहे. जायकवाडीचे प्रकल्पामध्ये प्रदेशावरून मोठ्या प्रमाणावर पक्षी येत असतात. ते पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. जायकवाडीच्या बॅक वॉटर जवळच इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे त्या ठिकाणी या प्रकल्पाला कायदेशीर अडचण येऊ शकते. या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Location :
Ahmadnagar Cantonment,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 10, 2023 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Jayakwadi Solar Project : जायकवाडी सौरऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा तापणार? स्थानिकांचा तीव्र विरोध, म्हणाले प्रकल्प रेटला तर..


