Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात तणाव! भजन करण्यावरुन पुजारी-भक्तांना मारहाण

Last Updated:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गुहा येथील कानिफनाथ मंदिर परीसरात पुजारी आणि भक्तांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात तणाव!
अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात तणाव!
अहमदनगर, 13 नोव्हेंबर (हरीष दिमोटे, प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गुहा येथील कानिफनाथ मंदिर परीसरात दोन गटांमध्ये वाद झाला आहे. यातून एका गटाने पुजारी आणी भक्तांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिराचा अनेक दिवसांचा वाद सुरू आहे. मुस्लिम समाजाकडून दर्गा असल्याचा दावा केला जात आहे, तर हिंदू समाजाकडून कानिफनाथ मंदिर म्हणून अनेक वर्षांपासून पूजा केली जात आहे. वाद न्यायालयात सुरू असताना आज पुजाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिर परीसरात आमावस्येनिमित्त प्रत्येक महिन्याला हिंदू बांधवांकडून भजन आणि पूजा केली जाते. त्यासाठी आलेल्या पुजारी आणि भक्तांना जमावाने मारहाण केली. यामुळे गुहा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मंदिराशेजारी असलेली अनाधिकृत मशिद सिल करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.
advertisement
काय आहे नेमका वाद?
कानिफनाथ मंदिराच्या नावे असलेली चाळीस एकर जमीन कोणालाही कल्पना न देता परस्पर वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि कागदोपत्री कानिफनाथ मंदिर नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असा उल्लेख करण्यात आल्याने न्यायालयीन लढा सुरू झाला. न्यायालयाचा कोणताही निकाल नसताना कानिफनाथ मंदिरात हिंदू बांधवांना प्रशासनाने आरती करण्यापासून रोखल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पूजा आणि आरती करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी आंदोन केले होते. तहसीलदारांच्या जमावबंदी आदेश मागे घेण्याच्या निर्णयामुळे अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
advertisement
दरम्यान, गुहा गावातील कानिफनाथ मंदिरात जमावबंदी आदेश लागून केल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या आंदोलनात गावारीत असंख्य नागरिक सहभागी झाले होते. प्रशानाच्या विरोदात घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी जमावबंदीचा आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर प्रशासनाने जमावबंदीचा आदेश मागे घेतला होता. त्यानंतर इथे पुन्हा पूजा अर्चा सुरू झाली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात तणाव! भजन करण्यावरुन पुजारी-भक्तांना मारहाण
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement