Vidhan Parishad Election 2024: 'वो मोहरे चल रहे थे मैं रिश्ते..' निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विखेंची पोस्ट व्हायरल; कुणावर साधला निशाणा?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vidhan Parishad Election 2024: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी राजेंद्र विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
अहमदनगर : राज्यात रिक्त झालेल्या 4 विधान परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी बंडखोरांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) आणि महायुती (Mahayuti) दोघांचीही डोकेदुखी वाढवली होती. यात काही ठिकाणी बंड थंड करण्यात यश आलं आहे. नाशिक शिक्षक निवडणुकीत अखेरच्या क्षणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतली. मात्र, ही आघार त्यांनी जड मनाने घेतल्याचे समोर आलं आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत माघार घेतल्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांनी सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियातील पोस्टमधून त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. पदवीधर पाठोपाठ शिक्षक मतदार संघातून राजेंद्र विखे यांनी माघार घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनधरणीनंतर माघार घेतल्यावर नाते निभावत असल्याची पोस्ट राजेंद्र विखे यांनी केली आहे.
advertisement
काय आहे पोस्ट?
शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया...
वो मोहरे चल रहे थे मैं रिश्ते निभा रहा था...
अखेरच्या क्षणी राजेंद्र विखे पाटील यांची माघार
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. प्रतिनिधी पाठवून नाशिक शिक्षक मतदार संघातून आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला. तीन वाजेपर्यंत राजेंद्र विखे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर राजेंद्र विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राजेंद्र विखे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
विधान परीषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील लढती
1) मुंबई शिक्षक मतदारसंघ
ज.मो. अभ्यंकर (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध सुभाष मोरे (शिक्षक भारती) विरुद्ध शिवाजीराव नलावडे (NCP AP)
2) मुंबई पदवीधर मतदारसंघ
अनिल परब (ठाकरे गट) विरुद्ध किरण शेलार (भाजप)
advertisement
3) नाशिक शिक्षक मतदारसंघ
संदीप गुळवे (ठाकरे गट) विरुद्ध किशोर दराडे (शिवसेना) विरुद्ध महेंद्र भावसार (Ncp AP) विरुद्ध विवेक कोल्हे (अपक्ष मूळ भाजपचा)
4) कोकण पदवीधर मतदारसंघ
view commentsरमेश कीर (काँग्रेस) विरुद्ध निरंजन डावखरे (भाजप)
Location :
Ahmadnagar Cantonment,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
June 12, 2024 9:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Vidhan Parishad Election 2024: 'वो मोहरे चल रहे थे मैं रिश्ते..' निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विखेंची पोस्ट व्हायरल; कुणावर साधला निशाणा?


