Ajit Pawar: अजितदादा कहाँ गये? हसन मुश्रीफांची नात ढसाढसा रडली, Video पाहून काळजाचं पाणी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लाडक्या दादाचं विमान अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता कळताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. बारामतीमधील वातावरण शोकाकूल झाले आहे. अनेकांसाठी हा जबरी धक्का आहे. पवार कुटुंबियांना आणि बारामतीकरांना पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. दरम्यान लाडक्या दादाचं विमान अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता कळताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज्यात शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ हेही बारामतीला रवाना झाले आहेत. तर कागलमध्ये मुश्रीफ यांची लहानगी नात आयेझा मुश्रीफ हिला या अपघाताची माहिती कळताच तीही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कागलमध्ये सभेच्या वेळी अनेकदा अजित पवार यांच्यासोबत तिची भेट झाली होती. त्यामुळे अपघाताची माहिती कळताच तिला अश्रू अनावर झाले.
advertisement
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
हसन मुश्रीफांची नात शाळेतून आल्यानंतर टिव्ही पाहत होती, त्यावेळी तिला सांगण्यात आलं की अजितदादा चले गये? त्यावेळी तिने विचारलं की कहाँ चले गये? त्यावेळी तिला सांगण्यात आले की अजित पवारांचा अपघात झाला त्यानंतर नात रडायला लागली..... हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी झालं.
अंत्यसंस्कार कधी होणार?
advertisement
अजित पवार यांच्या निधनाने राज्यात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानात अजित पवार यांच्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित राज्यातले सगळेच मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.
advertisement
नेमका कसा झाला अपघात?
आजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 5:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: अजितदादा कहाँ गये? हसन मुश्रीफांची नात ढसाढसा रडली, Video पाहून काळजाचं पाणी










