Amol Kolhe : अमोल कोल्हेंना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेरलं, भर कार्यक्रमात राडा; मंचरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा!

Last Updated:

शिरूरमधल्या विजयानंतर अमोल कोल्हेंच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राडा केला.

अमोल कोल्हेंना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेरलं, भर कार्यक्रमात राडा; मंचरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा!
अमोल कोल्हेंना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेरलं, भर कार्यक्रमात राडा; मंचरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा!
रायचंद शिंदे, प्रतिनिधी
मंचर : लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं, पण आता मविआमधल्या कुरबुरी पुन्हा समोर येऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अमोल कोल्हे निवडून आले. शिरूरमधल्या विजयानंतर अमोल कोल्हेंच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राडा केला.
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सभेतून काढता पाय घेतला. तसंच सभास्थळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
advertisement
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणात भावी आमदार म्हणून देवदत्त निकम यांचा उल्लेख केल्यामुळे सभास्थळावर शिवसेना कार्यकर्ते आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली. या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क आहे, इथे शिवसेनेचं मतदान आहे. अमोल कोल्हेंना भाषणात आंबेगाव मधून शिवसेनेचा आमदार येईल, असं जाहीर करण्याची विनंती केली. यानंतर ते गालातल्या गालात मिश्किलपणे हसले आणि त्यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला, असं म्हणत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.
advertisement
अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण
मी कुठलीही उमेदवारी जाहीर केलेली नाही, अजान सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि स्पष्टीकरण देता आलं नाही, त्यामुळे थोडा गैरसमज झाला. शिवसैनिक या त्वेषाने लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती, त्यांनी जीवाचं रान केलं. उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला नाही. महाविकासआघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हेंनी दिलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amol Kolhe : अमोल कोल्हेंना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेरलं, भर कार्यक्रमात राडा; मंचरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement