स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवायला शरद पवारांचा दबाव होता? अमोल कोल्हे म्हणाले...

Last Updated:

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, असा खुलासा अभिनेता अमोल कोल्हे यांनी केलाय.

अमोल कोल्हे
अमोल कोल्हे
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपट सध्या मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालतोय. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमुळे प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी चित्रपटगृहाबाहेर पडतायत. छावाच्या निमित्तानं अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिकाही पुन्हा एकदा चर्चेत आलीय. या मालिकेत संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे ही मालिका गुंडाळण्यात आली होती का? त्यासाठी कुणाचा दबाव होता का असे प्रश्न उपस्थित केले जाताय. त्यावर अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिलंय.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीनं दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, असा खुलासा अभिनेता अमोल कोल्हे यांनी केलाय. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास टीव्हीसाठीच्या विशेष नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असतं. त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सीन न दाखवण्याचा नैतिक माझ्यावर दबाव आल्याचे ते म्हणाले.
टीव्ही नियमावलीशिवाय आणखी एक दबाव असल्याचं कोल्हेंनी सांगितलं...तो दबाव म्हणजे नैतिकतेचा... टीव्हीवर 2 वर्षावरील सगळे प्रेक्षक मालिका पाहत असतात. त्यांच्या मनावर काय परिणाम होईल. रक्तपाताचे सीन दाखवताना आम्हाला काळजी घ्यावी लागते. तसे तीन आम्ही दाखवू शकत नाही, असे कोल्हे म्हणाले.
advertisement
छत्रपती संभाजीमहाराजांवर सलग 40 दिवस झालेले अत्याचार टीव्हीवर दाखवणं आमच्या नैतिकतेत बसत नव्हतं, असं सांगतानाच मला ट्रोल करणाऱ्यांना नेमकं काय पाहायचं होतं असा संतप्त सवालही कोल्हेंनी केला.. काय पाहायचं होतं , राजांच्या हत्या झालेली कुणाला पाहायची होती? असे त्यांनी विचारले.
खरं तर अमोल कोल्हेंना हे स्पष्टीकरण देण्यामागचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर कोल्हेंच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी य़ा टीव्ही मालिकेची चर्चा आहे. या मालिकेचा शेवट विशिष्ट प्रकारे का करण्यात आला? असा सवाल सोशल मीडियावर केला जात आहे. तसेच त्यामागे शरद पवारांचं कारणही सांगितलं जात आहे. त्याला कोल्हेंनी हे उत्तर दिलंय. मालिकेचा शेवट होईस्तोवर कधीही आम्हाला शरद पवार यांनी मालिकेच्या शेवटासंदर्भांत काही सांगितलं नाही, असं कोल्हे म्हणाले.
advertisement
अमोल कोल्हेंच्या या स्पष्टीकरणावरून राजकारण रंगलं नाही तरच नवलं. अमोल कोल्हे यांच्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद थांबणार की आणखी वाढणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट दाखवायला शरद पवारांचा दबाव होता? अमोल कोल्हे म्हणाले...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement