Amol Kolhe : 'गुलाबी रंग घेऊन आलेल्यांची अवस्था...', अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात
- Published by:Shreyas
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच धनंजय मुंडे विकासासाठी गेले तर विकास झाला का? असा सवालही अमोल कोल्हेंनी विचारला. तिरंग्याला गद्दारी मान्य नाही म्हणून तिरंगा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फडकला नाही. मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीतील हे शेवटचं झेंडावंदन असल्याची टीकाही अमोल कोल्हे यांनी केली आहे.
advertisement
तेलंगणामध्ये गुलाबी रंग घेऊन मैदानात आले पण सुपडा साफ झाला, तशीच येत्या निवडणुकीत गुलाबी रंग घेऊन आलेल्यांची अवस्था होईल, असा टोलाही अमोल कोल्हेंनी अजित पवारांना लगावला. बीडमध्ये बहीण लाडकी होती का? असा टोमणाही अमोल कोल्हेंनी धनंजय मुंडेंना लगावला.
लाडकी बहीण योजनेला विरोध नाही फक्त योजनेमागच्या हेतूला विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसला म्हणून लाडकी बहीण योजना आणली. योजना कोणतीही असू द्या, म्हणून लाडकी खूर्ची योजना. बात 15 लाख की हुई थी, 1500 पर सिमट गयी, अशी टीका अमोल कोल्हेंनी केली आहे.
advertisement
विकासासाठी गेलेल्या बीडच्या पालकमंत्र्यांच्या पक्षाने वक्फ बोर्डासंदर्भात अक्षरही काढलं नाही. लाचारी आणि गद्दारी खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्र गद्दारीपुढे झुकत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
August 15, 2024 9:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amol Kolhe : 'गुलाबी रंग घेऊन आलेल्यांची अवस्था...', अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात