Amravati Lok Sabha Election Results : नवनीत राणांसाठी निकाल 'कडू'; अमरावतीमधून सर्वात मोठी बातमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे, नवनीत राणा यांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. बळवंत वानखडे यांनी बाजी मारली आहे.
अमरावती, प्रतिनिधी : अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी बाजी मारली आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. बळवंत वानखडे 18 ते 20 हजार मतांनी विजयी होण्याचा अंदाज आहे. दरम्यान निकालाची घोषणा होताच नवनीत राणा यांचे कार्यकर्ते फेरमतमोजणीची मागणी करण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा यांना यावेळी महायुतीकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. मात्र त्यांच्या उमेदवारीला महायुतीमधीलच अनेक नेत्यांचा विरोध होता. बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या विरोधात भूमिका घेतली. त्याचा फटका हा राणा यांना बसला आहे. बच्चू कडू यांनी उघडपणे नवनीत राणा यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवारला झाला आहे. बळवंत वानखडे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
advertisement
दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राज्यात महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीला राज्यात तीस पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
June 04, 2024 5:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati Lok Sabha Election Results : नवनीत राणांसाठी निकाल 'कडू'; अमरावतीमधून सर्वात मोठी बातमी


