Amravati News : रात्री जेवणानंतर चिप्स खाल्ले अन्.. अमरावतीत 2 बहिणींचा एकाचवेळी मृत्यू, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Amravati News : अमरावती जिल्ह्यात दोन चुलत बहिणींचा शुक्रवारी पहाटे अचानक मृत्‍यू झाल्‍याने खळबळ उडाली आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र
अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : पालकांची चिंता वाढवणारी बातमी अमरावतीतून समोर आली आहे. ताप, पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्‍याने खाजगी दवाखान्‍यात उपचार घेल्‍यानंतर घरी आलेल्‍या दोन चुलत बहिणींचा शुक्रवारी पहाटे मृत्‍यू झाला. ही घटना धामणगाव रेल्‍वे तालुक्‍यातील विरूळ रोंघे येथे घडली आहे. अचानक दोघींचा मृत्यू झाल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.
नंदिनी प्रवीण साव (वय 10) आणि चैताली राजेश साव (11), अशी मृत मुलींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी दोघी चुलत बहिणी एकत्र खेळल्या, मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखणे, ताप आणि जुलाब सुरू झाले. तातडीने दोघींना धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघींना उपचारानंतर बरं वाटल्याने घरी सोडण्यात आले. मात्र अचानक रात्री दोघींची प्रकृती बिघडली. शुक्रवारी पहाटे नंदिनी आणि चैताली यांचा 10 मिनिटांच्या फरकाने मृत्यू झाला.
advertisement
आरोग्य विभागाचं पथक गावात दाखल
अमरावती जिल्ह्यातील विरुळ रोघें येथे आज पहाटे अन्नातून विषबाधेमुळे 2 मुलींचा मृत्यू झाला. दोघींच्या मृत्यूनंतर गावात आरोग्य विभागाची टीम दाखल झाली आहे. यावेळी शाळा, अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. गावातील पिण्याच्या पाण्याचे देखील नमुने घेण्यात आले. या दोन्ही मुलींनी रात्री घरीच जेवण केल्यानंतर सकाळी चिप्स खाल्ल्याची माहिती आहे. मात्र, अचानक त्यांना उलट्या जुलाब व्हायला लागलं. या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असल्याची माहिती धामणगावचे तहसीलदार गोविंद वाकडे यांनी दिली.
advertisement
वाचा - कॅसरोलमध्ये ठेवताच चपात्या ओल्या होतात, फॉलो करा ही सोपी ट्रिक
धक्कादायक म्हणजे गावात पुरवठा करण्याऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन नालीतून असून अनेक ठिकाणी तिला गळती लागल्याचेही समोर आले आहे.
view comments
मराठी बातम्या/अमरावती/
Amravati News : रात्री जेवणानंतर चिप्स खाल्ले अन्.. अमरावतीत 2 बहिणींचा एकाचवेळी मृत्यू, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement