Amravati News : पाणी आणण्यासाठी चिमुकला आईसोबत गेला, पण वाटेत भयंकर घडलं, गमावला जीव
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्धवट पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यात बुडून एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
अमरावती, संजय शेंडे, प्रतिनिधी : अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्धवट पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यात बुडून एका सहा वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपासून या पुलाचे काम प्रलंबित असून, आतापर्यंत या ठिकाणी विविध घटनेत चार बालकांचा मृत्यू झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरजवळ गाळेगाव जगतपूर रस्त्याच्या पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहे. या बांधकामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये रविवारी सहा वर्षांचा चिमुकला पडल्याची घटना घडली. या घटनेत त्याचा खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रोनक पवार असं या मुलांचं नाव आहे.
आई पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर रोनक आईच्या मागे गेला व त्या खड्ड्यात पडून रोनकचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पुलाचे बांधकाम प्रलंबित आहे. या खड्ड्यांमध्ये आतापर्यंत विविध घटनेत चार बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर या चिमुकल्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातानंतर नातेवाईकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलंच धारेवर धरण्यात आलं. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
June 17, 2024 10:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati News : पाणी आणण्यासाठी चिमुकला आईसोबत गेला, पण वाटेत भयंकर घडलं, गमावला जीव


