बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा कॉल; शरद पवारांना भेटल्यानंतर हालचाली
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला असल्याचं समोर येतंय.
संजय शेंडे, अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू आहे. दरम्यान, प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. महायुतीत बच्चू कडू नाराज असल्यानेच त्यांनी भेट घेतली असल्याच्या चर्चा रंगल्या. भेटीनंतरही बच्चू कडू यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला असल्याचं समोर येतंय.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून बच्चू कडू हे महायुतीत आहेत. मात्र महायुतीत बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केला. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. बच्चू कडू लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या भेटीत त्यांच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती समजते.
advertisement
अमरावतीत महायुतीची समन्वय बैठक होत आहे. त्या बैठकीलासुद्धा आमदार बच्चू कडू उपस्थित राहणार नसल्याची माहिती समजते. मुंबईत बच्चू कडू हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ते अमरावतीतील महायुतीच्या बैठकीला हजर राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले होते बच्चू कडू?
view commentsमोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतल्यानतंर बच्चू कडू म्हणाले होते की, आमची भेट आधीच ठरली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची आहे. शेतकरी , मजुरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. अंपगाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला एक संप्टेंबर पर्यत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल. याच मुद्द्यांवर शरद पवार यांची भेट घेतली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2024 10:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा कॉल; शरद पवारांना भेटल्यानंतर हालचाली


