'राहुल गांधींच्या जीभेला चटके द्या'; शिवसेनेनंतर आता भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राहुल गांधी यांच्या जीभेला चटके द्या असं वादग्रस्त वक्तव्य बोंडे यांनी केलं आहे, यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावती, संजय शेंडे, प्रतिनिधी : बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. विरोधक चांगलेच आक्रमक झाले. या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे बोंडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले बोंडे?
'संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे अशा लोकांना जिभेला चटके देणे आवश्यक आहे.' अशी टिका अनिल बोंडे यांनी केली आहे.
advertisement
राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत कुणीही असो, असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव, श्याम मानव यांच्यावरही यावेळी टीका केली आहे.
भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून 'जीभ छाटू नये तर जिभेला चटके' मात्र निश्चितच दिले पाहिजे असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
September 18, 2024 10:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
'राहुल गांधींच्या जीभेला चटके द्या'; शिवसेनेनंतर आता भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य


