विधानसभेला किती जागा लढणार? मुख्यमंत्र्यांच्या खास मंत्र्याने पहिल्यांदाच सांगितला आकडा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिवसेनेचा दुसरा सर्व्हे समोर आल्यानंतर जागावाटपची चर्चा सुरू झालीय. महायुतीला राज्यात किती जागा मिळतील याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आलाय.
संजय शेंडे, प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीत महायुतीची विभागीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीत शिवसेना किती जागांवर लढणार आहे याबद्दल मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेचा दुसरा सर्व्हे समोर आल्यानंतर या जागांबाबत चर्चा सुरू झालीय. महायुतीला राज्यात किती जागा मिळतील याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आलाय. यानंतर आता अमरावतीच्या मेळाव्यात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी आम्ही महायुतीत 74 जागा लढणार असून त्यापैकी 65 जागा जिंकणार असल्याचं म्हटलंय. आपण यासाठी काम करायचं असल्याचं उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
advertisement
उदय सामंत म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकित दोन गोष्टीने आपला घात केला. संविधान बदललं जाईल, मुस्लिमाना देश सोडावा लागेल, पण आपण ते समजावून सांगू शकलो नाही. पण जो पर्यंत चन्द्र सूर्य आहे तो पर्यंत संविधान कायम राहील हे आपण सांगितलं पाहिजे. आपले नेते 18 तास काम काम करत आहेत तर पदाधिकाऱ्यांनी 3 तास काम केलं तर येणाऱ्या निवडणुकीत 200 जागा आपल्या महायुतीच्या येतील असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
advertisement
शिवसेनेच्या दुसऱ्या सर्वेत काय आहे?
शिवसेनेच्या दुसऱ्या सर्वेनुसार 177 जागा महायुतीसाठी जरी अनुकूल असल्या, तरी इच्छुक उमेदवारांची रांगही तिनही पक्षांकडे तितकीच मोठी आहे. बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्याचं आव्हान पक्षासमोर असणार आहे. अशा परिस्थितीत उमेदवार निश्चित करताना तिनही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
advertisement
भाजपची 150 जागा लढण्याची तयारी
view commentsएका बाजूला भाजप राज्यात 288 पैकी 150 जागा लढण्याची तयारी करत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही भाजपने 150 जागा लढण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय. त्यातच आता शिवसेनेकडून 177 जागा अनुकूल असल्याचा सर्वे समोर आला आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरणार? कोणाला किती जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2024 2:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
विधानसभेला किती जागा लढणार? मुख्यमंत्र्यांच्या खास मंत्र्याने पहिल्यांदाच सांगितला आकडा


