मंत्री सामंत यांना पायलटने उड्डाणाला दिला नकार, विमानतळावरून गाडीने जाण्याची वेळ; पोलिसात तक्रार दाखल
- Published by:Suraj
Last Updated:
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना अमरावतीहून छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी विमातळावर पायलटने उड्डाणाला नकार दिला. यामुळे त्यांना गाडीने प्रवास करावा लागला.
संजय शेंडे, प्रतिनिधी
अमरावती : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना विमानतळावर पोहोचल्यानंतर पायलटनं टेक ऑफ करण्यास नकार दिला. यामुळे त्यांना चारचाकी गाडीने नियोजित ठिकाणी जावं लागलं. मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी नागपूर, अमरावती दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरला जाणार होते. त्यासाठी अमरावतीत ते विमानतळावर पोहोचले. तेव्हा पायलटनं त्यांना काही कारणांमुळे टेक ऑफ करता येणार नसल्याचं सांगितलं. शेवटी उद्योगमंत्री उदय सामंत यांना गाडीने छत्रपती संभाजीनगरला जावं लागलं. टेक ऑफला नकार देणाऱ्या पायलटविरोधात लोणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
advertisement
मंत्री उदय सामंत हे एका कार्यक्रमासाठी नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. एकाच दिवशी असणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईतील एक एअरक्राफ्ट घेतलं होतं. साडे चारच्या सुमारास अमरावतीहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी ते विमानतळावर गेले. ६ वाजता त्यांचा नियोजित कार्यक्रम होता.
advertisement
उद्योगमंत्री विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले. आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून, टेक ऑफ करा, अशी विनंती मंत्री सामंत यांनी वैमानिकाला केली. परंतु काही नियम सांगत वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वैमानिक गगन अरोरा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेवटी मोटारीने उद्योगमंत्री छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले. यावेळी उदय सामंत यांनी थेट कंपनीच्या मालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2024 8:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
मंत्री सामंत यांना पायलटने उड्डाणाला दिला नकार, विमानतळावरून गाडीने जाण्याची वेळ; पोलिसात तक्रार दाखल


