आता ड्रायव्हर सुद्धा शिफ्टमध्ये करतील काम; गडकरींचा मास्टर प्लॅन, केलं मोठं वक्तव्य

Last Updated:

केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन झालं.

News18
News18
अमरावती, संजय शेंडे, प्रतिनिधी : केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना ' येणाऱ्या काळात देशातून पेट्रोल डिझेलला हद्दपार करनार. वाहतूक पद्धतही बदलत जाणार आहे, मेळघाट सारख्या परिसरात ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर सुरू होणं गरजेचे आहे. देशात ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले गडकरी? 
' मी संकल्प केला आहे की, देशातून येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलला हद्दपार करनार.  वाहतूक पद्धतही बदलत जाणार आहे, मेळघाट सारख्या परिसरात ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर सुरू होणं गरजेचे आहे. देशात ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. ड्रायव्हरने फक्त आठ तास ड्रायव्हिंग करावे असा नियम करणार आहे. वाहन चालकांना व्यवस्थित परीक्षा घेऊन त्यांना लायसन देण्यात यावं, लायसन देण्यात फ्रॉड होऊ नये, एका ड्रायव्हरवर अनेकांचं जीवन अवलंबून असतं' असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशाला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतून साडेचार कोटी रोजगार मिळतो. येणाऱ्या काळात या इंडस्ट्रीमध्ये भारत जगातल पहिल्या क्रमांकावर राहिली. देशात शेतकऱ्यांना समृद्ध करण्याकरता इथेनॉल पॉलिसी आणली, ही इकॉनॉमी दोन लाख कोटींवर पोहोचली आहे. देशात लवकरच 400 इथेनॉल पंप सुरू करू, त्यामुळे ट्रान्सपोर्ट स्वस्त होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
आता ड्रायव्हर सुद्धा शिफ्टमध्ये करतील काम; गडकरींचा मास्टर प्लॅन, केलं मोठं वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement