अचलपूरमध्ये कमळ फुललं, बच्चू कडूंच्या पराभवाची नेमकी कारणे काय?, VIDEO

Last Updated:

bachhu kadu - अचलपूर मतदार संघात भाजपचे प्रवीण तायडे हे 78201 मतांनी विजयी झाले आहे. प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांना 12131 मतांनी पराभूत केले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या पराभवाची नेमकी कारणे काय असू शकतात? याबाबत अमरावतीमधील ज्येष्ठ पत्रकारांनी याबाबत महत्त्वाचे विश्लेषण केले.

+
बच्चू

बच्चू कडूंचा पराभव का झाला

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती - अमरावतीमधील 8 विधानसभा मतदार संघापैकी एक असलेल्या अचलपूर मतदार संघात ऐकून 22 उमेदवार रिंगणात होते. प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे अनिरूद्ध उर्फ बबलू देशमुख, भाजपचे प्रवीण तायडे या तीन उमेदवारात मुख्य लढत होती. यामध्ये सलग चारवेळा विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले बच्चू कडू 2024 च्या विधानसभेला देखील सामोरे गेले. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
advertisement
अचलपूर मतदार संघात भाजपचे प्रवीण तायडे हे 78201 मतांनी विजयी झाले आहे. प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांना 12131 मतांनी पराभूत केले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या पराभवाची नेमकी कारणे काय असू शकतात? याबाबत अमरावतीमधील ज्येष्ठ पत्रकारांनी याबाबत महत्त्वाचे विश्लेषण केले.
बच्चू कडू यांच्या पराभवाची नेमकी कारणे काय असू शकतात? याबाबत ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांनी लोकल18 शी बोलतांना सांगितले की, गेल्या काही वर्षात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा राजकारणातील पोत हा वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेला. त्यामुळे मतदारांवर वेगळ्या प्रकारचा परिणाम झाला असावा.
advertisement
त्यासोबतच त्यांनी राज्यामध्ये तिसरी आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी मतांची आणि इतर घटकांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे मतदार संघात कुठे तरी दुर्लक्ष झाले असावे, त्याचा फटका त्यांना यावेळी बसला आहे. 
advertisement
दुसरा फॅक्टर म्हणजे हिंदुत्वाचे राजकारण. गेल्या काही वर्षामध्ये भाजपने मजबूत केले आहे. त्यामुळे यावेळी त्यांनी अचलपूरमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे जातीय समीकरणामध्ये बच्चू कडू कमकुवत ठरले आणि त्यांना भाजपचे नवखे उमेदवार प्रवीण तायडे यांनी पराभवाचा धक्का दिला, असे ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
अचलपूरमध्ये कमळ फुललं, बच्चू कडूंच्या पराभवाची नेमकी कारणे काय?, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement