तुळजाई कला केंद्रात आणखी एक धक्कादायक प्रकार, 'छमछम' ला विरोध करणाऱ्या महिलेचा विनयभंग

Last Updated:

तुळजाई कला केंद्राविरोधात तक्रार केल्याने एका महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

Tuljai kala kendra
Tuljai kala kendra
धाराशिव : बीडच्या गेवराई तालुक्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या तुळजाई कला केंद्रासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कला केंद्राच्या तक्रारी केल्या म्हणून महिलेला धमक्या व विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर कलाकेंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.या प्रकरणी वाशी पोलिसात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तुळजाई कला केंद्राविरोधात तक्रार केल्याने एका महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  महिलेकडून दिलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कला केंद्र पुन्हा एकदा वादात 

समोर आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमसाला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड ही आरोपी आहे. पूजा गायकवाड वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथे असलेल्या तुळजाई कला केंद्राशी संबंधित होती. या कला केंद्राभोवती गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच केंद्रातील काही गैरप्रकारांबाबत स्वाती जोगदंड यांनी तक्रार केल्याने संबंधितांना राग आला.
advertisement

चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

या रागातून निलेश जोगदंड, सुशांत उंदरे, धनंजय मोटे आणि गणेश मोटे या चौघांनी महिलेला धमकावून शिवीगाळ केली, तसेच विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 351(2), 351(3) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध सुरू

advertisement
या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार महिलेने तुळजाई कला केंद्रातील गैरप्रकारांवर आवाज उठवल्यानंतरच तिच्यावर हल्ला केल्याची चर्चा सुरु आहे. घटनेनंतर महिलेने तात्काळ वाशी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

advertisement
दरम्यान, या घटनेमुळे तुळजाई कला केंद्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाशी या केंद्राचा अप्रत्यक्ष संबंध असल्याने आधीच संशय निर्माण झाला होता. आता या नव्या प्रकारामुळे कला केंद्राच्या कारभारावर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुळजाई कला केंद्रात आणखी एक धक्कादायक प्रकार, 'छमछम' ला विरोध करणाऱ्या महिलेचा विनयभंग
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement