Eknath Shinde : ''ठाणे हा आमचा बालेकिल्ला...'', शिंदे गटाला भाजपने पुन्हा डिवचलं, ''आता ...''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Vs BJP : ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटापेक्षा अधिक जागा जिंकत ठाण्यात भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असा दावा केला जात असताना भाजप आमदाराने मोठं वक्तव्य केले आहे.
ठाणे : उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन बंडाचे निशाण फडकवणारे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात घेरण्याची तयारी भाजपने केली आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटापेक्षा अधिक जागा जिंकत ठाण्यात भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असा दावा केला जात असताना भाजप आमदाराने मोठं वक्तव्य केले आहे. ठाणे हा आमचा बालेकिल्ला असल्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या विरोधात बंडाचे निशाण फडवले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात महायुतीचे सरकार आणले. विधानसभा निवडणुकीतील प्रचंड बहुमताने महायुतीने सत्तेत पुनरागमन केले. आता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.
भाजपने आपले मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात फ्री हँड दिल्याची चर्चा आहे. नाईकांनी थेट ठाण्यात जनता दरबार सुरू केला आहे. या माध्यमातून शिवसेना शिंदे गटापेक्षा भाजप अधिक सक्रीय असल्याचे दाखवण्यात येत आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाला घेरण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती अवलंबली आहे.
advertisement
ठाणे भाजपचा बालेकिल्ला, भाजप आमदारांनी शिंदेंना डिवचलं...
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला डिवचलं आहे. ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 9 आमदार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या 9 आमदारांच्या संख्याबळाच्या जवळपास कोणी नाही असे त्यांनी म्हटले. सामान्य माणसाचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे. वेळ पडेल तर सर्वांना सोबत घेऊन जाऊ. पण आता भाजप थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणणार...
आमदार संजय केळकर यांनी म्हटले की, प्रशासनाने योग्य ते गोष्टी जनतेला दिले पाहिजे. ठाणे महापालिकेत कचऱ्यापासून ते अनेक गोष्टींवरील गैरव्यवहाराविरोधात मी आवाज उठवला. येणाऱ्या काळात पुराव्यासह मी सगळं काही समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. चौकीदाराचं काम आम्हाला करायलाच पाहिजे. करोडो रुपये या महानगरपालिकेमध्ये येतात. या पैशाचा वापर लोकांपर्यंत झाला पाहिजे असेही केळकर यांनी म्हटले. संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काढत शिंदे गटाला अडचणीत आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
इतर संबंधित बातमी :
view comments
Location :
Thane,Maharashtra
First Published :
April 07, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : ''ठाणे हा आमचा बालेकिल्ला...'', शिंदे गटाला भाजपने पुन्हा डिवचलं, ''आता ...''


