BMC Elections : ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपने घेतला धसका? BMC निवडणुकीच्या सर्वेक्षणात समोर आला आकडा...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Elections : भाजपने केलेल्या सर्वेक्षणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले, तर मुंबईतील निवडणुकीच्या समीकरणांवर काय परिणाम होईल याचा विशेष अभ्यास करण्यात आला.
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई भाजपकडून एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वेक्षण अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले असून, त्यातून भाजपसाठी काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
या सर्वेक्षणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले, तर मुंबईतील निवडणुकीच्या समीकरणांवर काय परिणाम होईल याचा विशेष अभ्यास करण्यात आला. या दोघा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची शक्यता गृहित धरून विविध प्रभागांमधील जनतेचा कल, शिवसेना (ठाकरे), मनसे आणि काँग्रेसच्या संभाव्य जागा, आणि भाजपच्या विजयाच्या संधी यांचा सखोल आढावा घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
उद्धव-राज एकत्र आल्यास भाजपला किती जागा?
सर्वेक्षणातून मिळालेल्या निष्कर्षांनुसार, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तरी भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
भाजपचा पारंपरिक मतदार, मोदी-शहा यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि मुंबईत भाजपने केलेली कामगिरी या तीन घटकांमुळे भाजपची स्थिती बळकट असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मागील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला उपनगरात चांगले यश मिळाले होते. तर, मराठी बहुल मुंबई शहरातही लक्षणीय मते मिळाली होती. मात्र, मागील काही वर्षात मोठ्या राजकीय हालचाली, बदल झाले आहेत. शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरेंची ताकद कमी झाल्याचे म्हटले जात आहे. तर, राज यांचा प्रभावही मर्यादित असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजपच्या जागांवर फार परिणाम होणार नसल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
तर, भाजपची मुंबई महापालिकेवर सत्ता...
अंतर्गत सर्वेक्षणात भाजपला मुंबई महापालिकेवर आपला झेंडा रोवण्याची संधी असल्याचे म्हटले आहे.
भाजपने जर 150 हून अधिक जागा लढवल्या, तर पक्षाला अधिक फायदा होईल, असे म्हटले आहे. भाजप 150 जागांवर आपले उमेदवार उतरवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. मुंबई महापालिकेच्या 227 जागा आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 11:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Elections : ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपने घेतला धसका? BMC निवडणुकीच्या सर्वेक्षणात समोर आला आकडा...