बाईकच्या दोन्ही बाजूला दूधाचे कॅन, संशय येताच पोलिसांनी उघडला आणि सरकली पायाखालची जमीन
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी कधी लोक इतकी शक्कल लावतात की त्यांना वाटतं त्यांच्यापेक्षा हुशार कोणी असूच शकत नाही, पण असं असलं तरी अशा लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमीच तत्पर असतात.
वर्धा, नरेंद्र मते (प्रतिनिधी) : दुध हे आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून डॉक्टर तसेच आहार तज्ज्ञ ते दररोज पिण्याचा सल्ला देतात. यामुळे शरिराला कॅल्शिअम मिळते आणि हाडं मजबूत होतात. शिवाय याचे शरीराला इतरही फायदे आहेत. या उलट दारुमुळे शरीराचं नुकसान होतं, त्यामुळे त्याला न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
याच गोष्टीचा फायदा घेत दारु तस्करी करणाऱ्यांनी शक्कल वापरली आणि दारुची वाहतूक केली. पण ते पोलिसांपेक्षा जास्त हुशार निघाले नाही आणि पोलिसांनी त्यांचा हा प्लान हानून पाडला आणि त्यांच्या जवळील दारु जप्त केली.
हे तस्करी करणारे लोक चक्क दुचाकीवर दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या भरुवन घेऊन जात होते. त्यामुळे आता दुचाकीवर दूध विक्रेता हा आता दूध विक्रेता की दारु विक्रेता? असा सवाल उपस्थित झाला आहे.
advertisement
हा प्रकार वर्धा जिल्ह्यात घडला. या जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे विक्रीसाठी लोक वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. कधी देवघराच्या ड्रॉव्हावरमध्ये तर कधी जॅकेटमध्ये भरुन दारू जिल्ह्यात आणली जात होती. या गोष्टीचा छडा लावत पोलिसांनी आधीही या लोकांच्या मुस्क्या आवळल्या होत्या पण आता पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांचा प्लान हानून पाडला आहे.

advertisement
वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची देवळी परिसरात अवैध धंदे बंद करण्यासाठी पेट्रोलिंग सूरू तेव्हा मिळालेल्या माहितीवरून वर्धा ते कळंब मार्गावर सापळा रचला. नजर ठेवून असतांना पोलीसांनी एका हिरो होंडा गाडीवर प्रशांत कोंबे आरोपीला अटक केली आहे.
या व्यक्तीने दोन्ही बाजूला दूध विक्री करणारं कॅन लटकवलं होतं आणि तो चालला होता. पण त्याच्यावर संशय आल्याने त्याला अडवून झडती घेण्यात आली. तेव्हा पोलिसांना कॅनमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. दारू तस्करी करणाऱ्या आरोपीसह बार मालकवरही गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2024 10:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाईकच्या दोन्ही बाजूला दूधाचे कॅन, संशय येताच पोलिसांनी उघडला आणि सरकली पायाखालची जमीन


