आई....ती जीव वाचवण्यासाठी तडफडत राहिली अन् रेती तस्करी करणारा ट्रक चिरडून गेला बुलढाणा हादरलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यात सावरगाव नेहू येथे रेती तस्करांच्या ट्रॅक्टरने १० वर्षीय चिमुकलीला चिरडले, गावात शोककळा आणि कठोर कारवाईची मागणी वाढली आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: आई... ती विव्हळत राहिली अन् जीव वाचवण्यासाठी तडफडत राहिली, मात्र त्याला काहीच फरक पडला नाही. अक्षरश: रक्त रस्त्यावर सांडलं होतं आणि चिमुकला कणत राहिली तिने अखेर आई वडिलांसमोरच श्वास सोडला. ही धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. दिवसेंदिवस बुलढाण्यात रेती तस्करांचा उच्छाद वाढत आहे. आताही रेती तस्करांमुळे चिमुकलीचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे.
बुलढाण्यात भयंकर घडलं
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यामध्ये एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. सावरगाव नेहू गावात भरधाव रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एका निष्पाप १० वर्षीय चिमुकलीला चिरडलं. या घटनेती चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
खेळता खेळता सोडला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, घरात खेळत असलेली चिमुकली अचानक घराबाहेर धावत गेली, समोरुन भरधाव अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक आला आणि त्याने सुसाट वेगानं ट्रक पुढे नेला. चिमुकली आलेली दिसली असतानाही त्याने थांबवला नाही, तिला चिरडत तो पुढे निघून गेला. या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे. कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
advertisement
रेती तस्करांचा उच्छाद
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांनी निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा एका चिमुकलीचा जीव घेतल्याने गावकरी मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत. अनियंत्रित आणि बेकायदेशीर रेती वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी
या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने सावरगाव नेहू गावात दाखल झाले. पोलिसांनी अपघाताच्या घटनेचा पंचनामा केला असून, फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे अवैध रेती वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
Location :
Buldana (Buldhana),Buldana,Maharashtra
First Published :
October 02, 2025 1:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई....ती जीव वाचवण्यासाठी तडफडत राहिली अन् रेती तस्करी करणारा ट्रक चिरडून गेला बुलढाणा हादरलं