Chhagan Bhujbal : भुजबळ इज बॅक! देवाभाऊच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद, आज शपथविधी

Last Updated:

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे.

News18
News18
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील मोठी घडामोड आज होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. अनेकदा भुजबळांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये याच मुद्द्यावरून नाराजीही उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र, आता अखेर छगन भुजबळांची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागल्याने भुजबळांची नाराजी दूर झालीये. तसेच भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.
advertisement

नाशिकमध्ये आणखी एक मंत्रिपद...

नाशिकमध्ये आणखी एक मंत्रिपद भुजबळांच्या माध्यमातून मिळणार आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात माणिकराव कोकाटे यांचा समावेश झाला होता. त्यावेळी अजित पवारांनी भुजबळांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू होती. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता भुजबळांची एन्ट्री होणार आहे.
advertisement

>> भुजबळांची राजकीय कारकिर्द :

- शिवसेनेच्या तिकिटावर 1973 साली मुंबई पालिकेवर नगरसेवक
- 1973 ते 84 या काळात मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेता
- 1985 मध्ये मुंबईचे महापौर
- 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर
- 1985 आणि 1990 मध्ये शिवसेनेतून आमदार
- शिवसेनेत बंड करून काँग्रेसमध्ये सहभागी, मंत्रिमंडळात सहभागी
- नोव्हेंबर 1991 ते 1995 महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री
advertisement
- एप्रिल 1996 - विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड
- 1999 - राष्ट्रवादी स्थापनेनंतर शरद पवारांसोबत
- राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक
- राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष
- 1999 - काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री
- 1999- गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली
- एप्रिल 2002 - विधान परिषदेवर बिनविरोध निवड
- एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 - उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पदाची धुरा
advertisement
- 2004 - येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजयी
- नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 - सार्वजनिक बांधकाममंत्री
- 8 डिसेंबर 2008 - तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री
- 2009 ते 2024 सलग पाचवेळा विधानसभेवर विजयी
- 11 नोव्हेंबर 2010 - सार्वजनिक बांधकाम मंत्री, पर्यटन मंत्री
- 28 नोव्हेंबर 2019 - अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
advertisement
- 2 जुलै 2023 - अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhagan Bhujbal : भुजबळ इज बॅक! देवाभाऊच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद, आज शपथविधी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement