ऐन उन्हाळ्यात जलसंकट! संभाजीनगरमध्ये कुठं 11, तर कुठं 12 दिवसांपासून पाण्याचा थेंबही नाही!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Sambhajinagar Water Crisis: ऐन उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी निर्माण झालीये. काही भागात 12 दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाही.
छत्रपती संभाजीनगर: ऐन उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांवर जलसंकट कोसळलंय. शहरातील काही भागात 11 ते 12 दिवसांनी तर काही ठिकाणी आठवडाभराने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. शहराला 20 एमएलडी पाणी देणारी 200 मिमी व्यासाची जलवाहिनी तब्बल सात दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
संभाजीनगर शहराला रोज 220 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सध्या केवळ 120 ते 125 एमएलडी पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. महापालेकेचे सगळे नियोजन बिघडले असून शहरात 8 ते 9 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यात जलवाहिन्या फुटल्यामुळे 3 दिवस शहरांत पाणी आले नाही. तर काही भागात 10 ते 12 दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागली.
advertisement
आठवडाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत
शहराचा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून पूर्णपणे विस्कळीत आहे. फारोळा पंप हाऊस येथे बुधवारी रात्री 700 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली होती. ती गुरुवारी सकाळी दुरुस्त झाली. परत 1200 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व्ह निखळला. तो जलवाहिनी बंद न करता दुरुस्तीचे प्रयत्न करून काम पूर्ण केले. पण या सगळ्यात शहरवासीयांचा पाणीप्रश्न कायम आहे.
advertisement
किती दिवसांपासून शहरात पाणी नाही
विद्यानगर, पदमपुरा, शिवाजीनगर-रामकृष्णनगर या भागात आठ दिवसापासून पाणी येत नाही.
रेल्वेस्टेशन गोळेगावकर कॉलनी, भडकलगेट-टाऊन हॉल, एन-4, एन-11 रवींद्रनगर या ठिकाणी 9 दिवस झाले पाणी येत नाही.
समर्थनगर, गारखेडा नंदीग्राम कॉलनी, रवींद्रनगर-शिवशंकर कॉलनी, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, गणेश कॉलनी, एन-4 न्यायमंदिर रोड या भागात गेल्या दहा दिवसापासून पाणीबाणी आहे.
advertisement
बसय्येनगर, जोहरीवाडा-रंगारगल्ली, भीमनगर-भावसिंगपुरा या भागात 11 दिवसांपासून पाण्याचा थेंबही आलेला नाही.
खिंवसरा पार्क, आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, हिलाल कॉलनी या भागात तर 12 दिवसांपासून पाणी आलेलं नाही.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
March 29, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ऐन उन्हाळ्यात जलसंकट! संभाजीनगरमध्ये कुठं 11, तर कुठं 12 दिवसांपासून पाण्याचा थेंबही नाही!


