Bus Stop: प्रशासनाने बस थांबेच केले गायब! लोअर परळमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांचे हाल
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Bus Stop: लोअर परळच्या जुन्या पुलाच्या दोन्ही टोकांवर वरळी आणि दादरच्या दिशेला जाण्यासाठी बस थांबे होते.
मुंबई: गर्दीचा आणि हजारो प्रवाशांची ये-जा असलेल्या लोअर परळमध्ये सध्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लोअर परळमध्ये जुन्या पुलाच्या जागी उभारलेल्या नवीन पुलावरील दोन बस थांबे बंद केल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना बेस्ट बससाठी पायपीट करावी लागत आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे जास्त हाल होत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ भागात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. शिवाय, स्थानिक रहिवाशांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे या परिसरात दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. लोअर परळच्या जुन्या पुलाच्या दोन्ही टोकांवर वरळी आणि दादरच्या दिशेला जाण्यासाठी बस थांबे होते. या थांब्यांमुळे रेल्वे स्टेशनवर उतरलेले प्रवासी, माधव भुवन परिसरातील नागरिक तसेच डिलाईल रोड आणि करी रोड भागातील प्रवाशांची चांगली सोय होत होती.
advertisement
नवीन बांधलेल्या पुलावर दोन्ही बस थांबे तयार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लोअर परळ परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवाय, महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वेतून उतरलेल्या प्रवाशांना बेस्ट बससाठी खूप लांबपर्यंत चालत जावं लागत आहे.
advertisement
दोन्ही बस थांबे पूर्ववत ठेवण्यासाठी नागरिकांनी अनेकदा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी नाहीतर आंदोलन करावं लागेल, असा नागरिकांनी इशारा दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bus Stop: प्रशासनाने बस थांबेच केले गायब! लोअर परळमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांचे हाल