Maratha Morcha : मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं, CM फडणवीसांची जरांगेंच्या मागणीवर थेटच भाष्य, त्यांना आता...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Tushar Rupanwar
Last Updated:
BJP Leader On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आमदाराने थेट भाष्य केले आहे.
मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वातील भगवं वादळ आझाद मैदानात धडकलं. मोठ्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक ठप्प झाली. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आमदाराने थेट भाष्य केले आहे.
advertisement
मनोज जरांगे यांनी मराठा-कुणबी एकच असल्याचे प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात केल्यास आधीच या प्रवर्गात असलेल्या जात प्रवर्गाचा हक्क डावलला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
मराठा आरक्षणावरून राज्यभर तापलेल्या वातावरणात भाजपा आमदार परीणय फुके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आहे. ही मागणी संविधानाच्या चौकटीत राहूनच आरक्षणाचा निर्णय होईल, असे फुके यांनी म्हटले.
advertisement
पवार-ठाकरेंना थेट आवाहन...
परिणय फुके म्हणाले की, जर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असेल, तर त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा समाजासाठी फडणवीसांच्या योजना...
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अनेक योजना राबवल्याचे फुके यांनी सांगितले. “युवकांना उद्योजक बनवण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे. आरक्षणाबरोबरच संधींचं दार उघडणंही महत्त्वाचं आहे,” असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, माझी मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाला विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. दोन समाजाला समोरासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. दोन्ही समाजाचे प्रश्न आम्ही सोडविणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजाने लक्षात घ्यावे, की त्यांच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही तसेच मराठा समाजाने देखील हे लक्षात घ्यावे की त्यांचे प्रश्न आम्हीच सोडवू असे त्यांनी म्हटले. आतापर्यंत आम्हीच प्रश्न सोडवले आहेत. मराठ्यांचे प्रश्न दुसऱ्या कोणत्या पक्षाने सोडविल्याचे त्यांनी सांगावे. आमच्या सरकारशिवाय प्रश्न कधी सुटले? असा प्रश्न त्यांनी केला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Morcha : मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं, CM फडणवीसांची जरांगेंच्या मागणीवर थेटच भाष्य, त्यांना आता...


