Devendra Fadnavis : भाजप 90 टक्के जागा जिंकेल अशी अपेक्षा नव्हती, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

Last Updated:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक निकालाबात मोठं विधान केलं आहे.

News18
News18
मुंबई : राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व असं यश मिळालं. एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षाही प्रचंड बहुमताने महायुतीने निवडणूक जिंकली. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक निकालाबात मोठं विधान केलं आहे. भाजपने लढवलेल्या एकूण जागांपैकी ९० टक्के जागा जिंकू अशी अपेक्षा नव्हती असं फडणवीस यांनी म्हटलंय. सीएनबीसी टी१८च्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड सोहळ्यात ते बोलत होते.
फडणवीस यांनी म्हटलं की, आम्ही इतक्या जागा येतील अशी अपेक्षा केली नव्हती. पाच टक्के मतदान जास्त झालं होतं. त्याचे दोन परिणाम येण्याची शक्यता होती. एक दारूण पराभव किंवा मोठा विजय. प्रत्यक्ष राज्यातली परिस्थिती पाहता मला विजय होईल अशी खात्री होती. लाडकी बहीण योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक है तो सेफ है हा नारा आमच्यासाठी जादूई ठरला. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना मला विश्वास होता आणि मी संयमाने काम केलं असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
advertisement
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. महायुतीच्या सरकारबाबत होत असलेल्या चर्चांवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र आहोत आणि एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून आमच्यासोबतच आहेत." मंत्रिमंडळात खातेवाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. यावर फडणवीस म्हणाले की, गृह, नगरविकास आणि अर्थ खात्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि यावर रविवारी निर्णय होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : भाजप 90 टक्के जागा जिंकेल अशी अपेक्षा नव्हती, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement