भल्या पहाटे अजित पवार ऑन फायर, 2 मिनिटं उशीर झाल्याने PMRDAच्या अधिकऱ्यांना झापलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी विकासकामांची पाहणी करायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांना झापलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी विकासकामांची पाहणी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांनी त्या त्या भागातील नागरिकांच्या तक्रारी देखील ऐकून घेतल्या. पण याच वेळी अजित पवार यांनी एका अधिकाऱ्याला झापलं आहे. दोन मिनिटं उशीर झाल्याच्या कारणातून अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्याला झापलं आहे. याबाबतचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं तर, अजित पवार जेव्हा जेव्हा पहाटे अशाप्रकारे एखाद्या शहराचा दौरा करतात, त्या त्या वेळी सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन आणि पत्रकार अशा सर्वांचीच दमछाक होत असते. ते अचानक कुठल्याही ठिकाणी जाऊ चौकशी करतात. कामाची पाहणी करतात. आजही ते अशाच प्रकारे पुणे दौऱ्यावर असताना एका अधिकाऱ्याला घटनास्थळी यायला दोन मिनिटं उशीर झाला. यावरून अजित पवारांनी त्यांना झापलं आहे.
advertisement
"आहो, वसईकर इकडं या, कुठे जाऊ बसता हो तुम्ही" अशा शब्दात अजित पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्याला झापलं आहे. भल्या सकाळी अजित पवार पुण्यातील रिंग रोड आणि बाकी रस्त्यांबाबत चर्चा करत होते. त्यांना रस्त्याचा आराखडा अधिकाऱ्यांकडून समजावून सांगितला जात होता. संबंधित रस्ता बांधताना काय काय सुविधा देता येतील, याबाबत अजित पवार चर्चा करत होते.
advertisement
दरम्यान, तिथे एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी अधिकाऱ्याचं नाव घेत त्यांना झापलं आहे. दोन मिनिटं उशीर का झाला, असं विचारत त्यांनी कानउघडणी केली. यावेळी यानंतर त्यांनी वारजे माळवाडी परिसरातील शिवणे पुलाची देखील पाहणी केली. पुण्यात पाऊस पडल्यानंतर सर्वात आधी हा शिवणे पूल पाण्याखाली जातो, त्यामुळे संबंधित पुलाची उंची वाढवण्याबाबत अजित पवारांनी चर्चा केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 11, 2025 7:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भल्या पहाटे अजित पवार ऑन फायर, 2 मिनिटं उशीर झाल्याने PMRDAच्या अधिकऱ्यांना झापलं