घरात पाणी, आयुष्य ओसाड, नैराश्यातून पुलावरून उडी... पण धाडसी तरुण ठरला ‘देवदूत'

Last Updated:

मुसळधार पावसामुळे त्यांच्या निवाऱ्यात पाणी शिरले आणि सर्व साहित्य भिजून गेले. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

News18
News18
धाराशिव :  धाराशिव जिल्ह्यातील सापनाई गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. सततच्या पावसामुळे त्रस्त झालेल्या आणि घरातील सर्व साहित्य भिजल्याने हताश झालेल्या वृद्ध महिलेने दहिफळ येथील तेरणा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, गावातील धाडसी तरुणाने जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचवले. या थरारक बचावाची व्हिडिओ क्लिप समोर आली असून परिसरात घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
भागुबाई वाघमारे असे या महिलेचे नाव असून त्या सापनाई येथील आहेत. पती आणि मुलं कोणीही नसल्याने त्या एकट्याच राहत होत्या. गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी एक छोटासा निवारा करून दिला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या निवाऱ्यात पाणी शिरले आणि सर्व साहित्य भिजून गेले. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
advertisement

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, भागुबाई यांनी बुधवारी सकाळी दहिफळजवळील तेरणा नदीच्या पुलावरून खाली उडी मारली. मात्र, योगायोगाने त्याच वेळी तेथून जात असलेल्या स्कूलबस चालक अमोल भातलवंडे यांनी हा प्रकार पाहिला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी नदीत उडी घेतली आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाशी झुंज देत भागुबाईंचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement

तरुणाच्या धाडसाची पंचक्रोशीत चर्चा

घटनेनंतर गावकऱ्यांनी भागुबाई वाघमारे यांना तातडीने सापनाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अमोल भातलवंडे या तरुणाने दाखवलेले धाडस हे खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी असून पंचक्रोशीत याची चर्चा होत आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

advertisement
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उभी शेती पिकं आडवी झाली आहेत. काही पिकं वाहून गेली आहेत. जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशीमागणी केली जात आहे. अतिवृष्टीचा आणि पुराचा मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे. या संकटातून आता कसे बाहेर पडायचे असा सवाल अनेक शेतकऱ्यांना केला आहे. सरकरानं कोणतेही निकष न लावता पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्यातील शेतकरी करताना दिसत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरात पाणी, आयुष्य ओसाड, नैराश्यातून पुलावरून उडी... पण धाडसी तरुण ठरला ‘देवदूत'
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement