Eknath Shinde : महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, अन् सुप्रीम कोर्टातून आली मोठी अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde : महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान सुप्रीम कोर्टातून अपडेट समोर आली आहे.
मुंबई: महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमध्ये अजित पवारांकडून शिंदे गटाची कोंडी होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निधी न देणे, विरोधकांना परस्पर पक्षात प्रवेश देणे, या मुद्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान सुप्रीम कोर्टातून अपडेट समोर आली आहे.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. शिवसेनेतील फूटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. आता तब्बल दीड वर्षांनी, या प्रकरणावर 7 मे रोजी (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
advertisement
या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे 'शिवसेना' हा मूळ पक्ष कोणाचा आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह कुणाकडे राहणार, याच्या सुनावणीस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
सुप्रीम कोर्टात तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाच्या निकालात अनेक महत्त्वाच्या मुद्याचा समावेश होता.
advertisement
त्यानंतर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील याआधी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यांच्या निकालानुसार, शिंदे गटातील आमदार अपात्र ठरले नाहीत आणि विधीमंडळातील शिवसेना पक्ष शिंदे गटाकडेच गेला. विशेष म्हणजे ठाकरे गटातील आमदार देखील अपात्र करण्यात आले नाहीत. तर, दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या दृष्टीने शिवसेना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण हे शिंदे गटाकडे सुपूर्द केले.
advertisement
यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये महायुती पुन्हा सत्तेत आली आणि शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर, बुधवारी होणारी सुनावणी हा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटासाठी महत्त्वाची असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2025 2:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, अन् सुप्रीम कोर्टातून आली मोठी अपडेट