'आधी केले मग सांगितले...' अधिवेशनादिवशी पर्यावरण मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचा मोठा निर्णय

Last Updated:

Pankaja Munde EV Car: मंत्री पंकजा यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादिवशी मोठा निर्णय घेतला आहे.

पंकजा मुंडे (पर्यावरणमंत्री)
पंकजा मुंडे (पर्यावरणमंत्री)
मुंबई : पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून पंकजा मुंडे गेली काही महिने अतिशय गांभीर्यपूर्वक काम करीत आहेत. नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन त्यांनी वेळोवेळी केले आहे. मंत्री पंकजा यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादिवशी मोठा निर्णय घेत 'आधी केले मग सांगितले...' या उक्तीनुसार प्रदूषणाला दूर लोटण्यासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही काळापासून होत असलेले वातावरणातील बदल हे गंभीर आणि अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळे विकसित, संपन्न, समृद्ध आणि दिशादर्शक कामे करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांनी प्रदूषणाला दूर लोटण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात पंकजा मुंडे यांनी मंत्रालयापासून केली. आता प्रदुषणमुक्तीसाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करण्याचा निर्णयही पंकजा यांनी घेतला आहे.
advertisement

इलेक्ट्रिक कार घेतली, प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी संदेश 

पर्यावरण मंत्री या नात्याने प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी एक संदेश म्हणून आजपासून मी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला. याच कारमधून आज अधिवेशनाला जाण्यासाठी रामटेक निवासस्थान ते विधिमंडळ असा प्रवास केला. 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे सर्वांनी प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी ईव्ही वाहनाला प्राधान्य द्यावे जेणेकरून प्रदुषण कमी होण्यास त्याची फार मोठी मदत होईल.
advertisement
दरम्यान, सकाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी ईव्ही कारचे विधीवत पूजन केले. यावेळी महिन्द्रा कंपनीकडून नव्या कारची चावी त्यांनी स्वीकारली.
advertisement

पंकजा मुंडे यांचे प्लास्टिकविरोधी अभियान

राज्य सरकारने एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान सुरू केले. अशा अभियानात लोकसहभाग असेल तर हे उपक्रम यशस्वी होतात. एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात मंत्रालयापासून केली. बदलती जीवनशैली व वातावरणातील बदलांमुळे कर्करोगासारखे आजार आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तंत्रज्ञान वाढले तसे त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. यासर्वांपासून पर्यावरण वाचविण्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या पिढीने प्लास्टिक बाटल्या न वापरणे, एकल वापराच्या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे अशी पाऊले उचलली तर पुढच्या पिढीसाठी चांगले जीवन मिळेल.
advertisement
पुढील पाच वर्षात एकल वापराचे प्लास्टिक पूर्णतः बंद करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अशी उत्पादने तयार करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने एकल प्लास्टिक वापरणे बंद केले तरच अशी उत्पादने तयार करणे आपोआप बंद होईल, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आधी केले मग सांगितले...' अधिवेशनादिवशी पर्यावरण मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement