advertisement

पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महिला आमदारांचं निधन

Last Updated:

Pune News : अजित पवार खाजगी विमानाने काल सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. तर दुसरीकडे  मावळ तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि पहिल्या महिला आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपलेखा खंडेराव ऊर्फ दादासाहेब ढोरे (वय ७६) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Pune News
Pune News
पुणे :  अजित पवार खाजगी विमानाने काल सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. तर दुसरीकडे  मावळ तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि पहिल्या महिला आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपलेखा खंडेराव ऊर्फ दादासाहेब ढोरे (वय ७६) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, पुतणे तसेच नातवंडांचा मोठा परिवार आहे.
रुपलेखा ढोरे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. १९९३ ते १९९५ या कालावधीत त्यांनी मावळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळली.
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत रुपलेखा ढोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण मिळाले. त्या वेळी त्यांनी आणि त्यांचे पती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खंडेराव ढोरे यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रभावी नेते आणि ज्येष्ठ राजकारणी मदनशेठ बाफना यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
advertisement
या विजयासोबतच रुपलेखा ढोरे मावळ तालुक्यातील पहिल्या महिला आमदार ठरल्या,तसेच भाजपच्या पहिल्या आमदार होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता.
अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दिवंगत अजित पवार यांच्यावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्य सरकारकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती देताना सांगितले की, अजित पवारांचे पार्थिव सायंकाळी पावणेसात ते साडेआठ या वेळेत काटेवाडी येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर बारामतीतील गदिमा सभागृहात सकाळी दहा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल. सकाळी अकरा वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महिला आमदारांचं निधन
Next Article
advertisement
Ajit Pawar Plane Crash: ४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर
४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

  • अपघातग्रस्त विमानाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement