वनसंपदा ठरली महिलांसाठी वरदान; दुर्गम गावाचा पाहा कसा झाला कायापालट Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या गावात राहणाऱ्या महिलांसाठी वनसंपदा मोठे वरदान ठरली आहे.
नागपूर, 6 ऑक्टोबर: गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला असुन या भागात फार मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आहे. याच भागातील झाडीपट्टीत मिळणाऱ्या असंख्या झाडांचे औषधी गुणधर्म असुन आजही अनेक आजारांवर तो औषध म्हणून उपयोग केला जातो. याच झाडांचे मोल लक्ष्यात घेता गडचिरोली जिल्हातील पोर्ला या गावात राहणाऱ्या सुमारे 270 हून अधिक महिलांसाठी हि वनसंपदा मोठे वरदान ठरली आहे.
अभिनव उपक्रम
गडचिरोली जिल्ह्यावर निर्मात्याने मुक्त उधळण केली आहे. त्याच्यप्रमाणे या जिल्ह्याने आपल्या अंगाखांद्यावर विपुल प्रमाणात वनसंपदा देखील मिरवली आहे. मात्र, याच जिल्ह्याला दुर्दैवाने नक्षलवादी कारवाईचे कायम सावट राहिले आहे. म्हणूनच कि काय आजही या जिल्ह्यातील काही गाव मुळ विकासापासून कोसो दूर आहे. आजही या जिल्ह्यात बेरोजगारी हा एक मुख्य प्रश्न असुन बहुतांश लोक शेती आणि शेतीशी संलग्न व्यवसायावर निर्भर आहेत. याच धर्तीवर गडचिरोली येथील गडचिरोली हर्बल क्लस्टर बहुउद्देशीय सहकार्य संस्था मर्यादित अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली हर्बल क्लस्टरच्या माध्यमातून पोर्ला या गावी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
advertisement
महिलांना रोजगार
गडचिरोली हर्बल क्लस्टरच्या माध्यमातून वनातील वनऔषधी पाला पाचोळा, बिया, झाडांचे साल, इत्यादि गोळा करून त्यातून रोजगार निर्मिती केली जातं आहे. ज्या माध्यमातून जिल्ह्यातील 270 हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून झाडीपट्टीत मिळणाऱ्या वनऔषधी गोळा करून त्यांची प्रोसेसिंग आणि विक्री करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. शिवाय कारखानदार, वैदू, आणि गरजुनांही वनऔषधी मिळण्यासाठी मोठी सोय झाली आहे.
advertisement
प्रक्रिया करून वनस्पतींची विक्री
view commentsगडचिरोली जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला वनात जाऊन औषधी वनस्पती गोळा करतात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून या वनस्पतींची विक्री करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने कडूनिंब, गुळवेल, अडुळसा, भुईनीम, हिरडा, बहवा, बेहडा, अर्जुन साल इत्यादींसारख्या 50 हून अधिक वनस्पतींचा समावेश आहे, अशी माहिती या क्लस्टरचे पदाधिकारी गणेश भोयर यांनी दिली.
Location :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
October 06, 2023 8:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
वनसंपदा ठरली महिलांसाठी वरदान; दुर्गम गावाचा पाहा कसा झाला कायापालट Video

