सर्व मसाल्यांची चव एकाच पानाला, 500 हून अधिक दुर्मिळ झाडांची परसबाग पाहिलीत का? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नागपुरातील आजोबांना आईमुळे वृक्षसंवर्धनाचा छंद जडला. त्यांनी आपल्या घरीच 500 हून अधिक दुर्मिळ झाडांची बाग फुलवलीय.
नागपूर, 5 ऑक्टोबर: व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाने एखादी कला अथवा छंद जोपासलेला असतो. हाच छंद आपले आयुष्य अधिक समृद्ध करत असतो. शिवाय जन्मभर आपली साथ देखील देत असतो. असाच एक छंद नागपुरातील रमेश सातपुते यांनी जोपासाला आहे. आईच्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या परसबागेत 500 हून अधिक मसाले आणि औषधी झाडांची लागवड केलीय. विशेष म्हणजे या झाडांची देखभाल नातवंडांप्रमाणे करत असल्याचे सातपुते सांगतात.
आईमुळं लागला छंद
वृक्ष संवर्धनाचे संस्कार आमच्या आईने आम्हाला दिले. प्रसिद्ध चित्रकार असलेल्या शकुंतला सातपुते या जेव्हा बर्डी वरून गिरीपेठ येथे राहण्यासाठी आल्या तेव्हा त्यांनी या सध्याच्या घरातील अंगणात बाग फुलावली. आज या घर आणि बागेला 47 वर्ष पूर्ण होत आहेत. कालांतराने आईणुळे मला देखील हा छंद लागला. तो आज देखील कायम असल्याची माहिती रमेश सातपुते यांनी दिली.
advertisement
वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या अभंगातून जगतगुरु तुकोबारायांनी वृक्षाचे मोल सांगितले आहे. वृक्ष, निसर्ग आणि माणूस हा एकमेकांमध्ये गुरफटालेला आहे. सिमेंटची उभी राहणारी जंगले आणि मुळ निसर्गाचा होणारा ऱ्हास हा हल्लीचा मोठा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी योगदान देणे, निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेने मी या बागेत रमत असतो आणि इतरांना देखील प्रेरित करत असतो, असं सातपुते सांगतात.
advertisement
परसबागेत दुर्मिळ वनस्पती
आमच्या बागेचे वैशिष्ट्ये म्हणजे आमच्या बागेत सर्व प्रकारची सुमारे 500 हून अधिक झाडे आहेत. त्यात मसाल्यांची झाडे अधिक आहेत. इलायची, मिरे, लवंग, वेलची, आजवाईन, दालचिनी, 70 फूट उंच तेजपानचे झाड आदी वनस्पती येथे आहेत. त्यात काही विशेष फळांचा देखील समावेश आहे. स्टार फ्रुट ऑफ अमेरीका म्हणून ओळखले जाणारे कमरकचे झाड यापैकीच एक आहे. डिसेंबरमध्ये हे झाड या रसरशित फळांनी बहरून निघते. तसेच स्ट्रॉबेरी, चेरी अशी फळे देखील आहेत, असे सातपुते सांगतात.
advertisement
काही झाडांचा विशेष उल्लेख करायचा झाला तर बसमती म्हणून एक झाड आहे. ज्याचे एक पान कुठल्याही तांदूळामध्ये टाकले कि संपूर्ण भाताला बासमती तांदळाचा सुगंध येतो. अजून एक झाड असे आहे ज्याचे एक पान हे सर्व मसाल्याची चव देऊन जातं. तर बदक फुल, ब्रम्ह कमळ अशी काही दुर्मिळ फुले आमच्या कडे बघायला मिळतात, असे देखील सातपुते सांगतात.
advertisement
आवड आणि सवड महत्वाची
view commentsनुसताच छंद असून चालत नाही तर या वृक्षाची लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. शिवाय घरातील सर्वांना त्याची आवड असली पाहिजे. मी अनेक रोपांची निर्मिती करत असतो. त्यांची विक्री देखील होते. मात्र त्यापेक्षा मला आत्मिक समाधान आणि माझा जाणारा उत्तम वेळ हे फार महत्वाचे आहे. आमच्या इथे बाग पाहण्यासाठी लांबून लोक येतात. मसाल्याची झाडे, औषधी झाडे, काही दुर्मिळ झाडे हे या बागेचे वैशिष्ट्य असल्याने अनेक विद्यार्थी देखील येतात. या बागेत काम करताना मी देहभान हरवून जातो. खरंतर मी बाग फुलवली नाही तर ही बाग मला अधिक फुलवते, असे सातपुते म्हणतात.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 05, 2023 3:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
सर्व मसाल्यांची चव एकाच पानाला, 500 हून अधिक दुर्मिळ झाडांची परसबाग पाहिलीत का? Video

