KDMC: कल्याण डोंबिवलीतील शाळांना 1 की 2 दिवस सुट्टी? केडीएमसीने पत्रक केलं जाहीर
- Published by:Sachin S
Last Updated:
कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने धुमशान घातलं आहे. अशातच मुंबईतील कुलाबा हवामान विभागाने ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
डोंबिवली: कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. खबरदारी म्हणून आता 18 ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी दिली होती. पण पावसाचाा जोर आणखी वाढला आहे. हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे १९ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने धुमशान घातलं आहे. अशातच मुंबईतील कुलाबा हवामान विभागाने ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली परिसरातील अनुदानित- विना अनुदानित शाळांना अतिवृष्टीमुळे दिनांक १८/०८/२०२५ आणि १९/०८/२०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा विचार करून कल्याण डोंबिवली क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या पुर्व प्राथमिक / प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक/खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना दि. १८/०८/२०२५ आणि १९/०८/२०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
advertisement
१८ तारखेला दुपार सत्रातील चालू असणा-या शाळांतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आली होती. तसंच मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय शाळा मुख्यालय सोडू नये, असेही आदेश दिले होते. आता १९ तारखेलाही शाळांना सुट्टी दिली आहे. १८/०८/२०२५ आणि १९/०८/२०२५ रोजी नियोजित असणारी सर्व प्रशिक्षणं, परिक्षा, इत्यादी नजीकच्या काळामध्ये आपल्या स्तरावर पूर्ण करण्याचे नियोजन करण्याची सूचनाही शाळांना दिली आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
August 18, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC: कल्याण डोंबिवलीतील शाळांना 1 की 2 दिवस सुट्टी? केडीएमसीने पत्रक केलं जाहीर