IPPB Recruitment : सरकारी नोकरीची संधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत बंपर भरती; असा करा अर्ज
Last Updated:
IPPB Recruitment 2025 : पोस्ट बँकेत पदवीधरांसाठी भरती सुरू झाली आहे. 348 कार्यकारी पदांसाठी अर्ज ऑनलाईन 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत करता येईल. सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी गमावू नका. आजच अर्ज करा.
जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा पदवी पूर्ण करून नोकरीसाठी संधी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने पदवीधर उमेदवारांसाठी कार्यकारी पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरतीत एकूण 348 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 9 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 29 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की ही भरती संपूर्ण भारतभरातील विविध राज्यांमध्ये नियुक्तीसाठी आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळेल. ही संधी मुख्यत्वे त्या सर्व पदवीधरांसाठी आहे जे सरकारी नोकरीत प्रवेश घेण्याची तयारी करत आहेत.
advertisement
पात्रता काय असेल?
कार्यकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. पदवी कोणत्याही शाखेतली असू शकते. तसेच, मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय 20 ते 35 वर्ष दरम्यान असावे. वयाची गणना 1 ऑगस्ट 2025 च्या तारखेवरून केली जाईल.
अर्ज कसा करावा:
1)सर्वप्रथम इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ippbonline.com
advertisement
2)मुख्य पृष्ठावर “सद्याच्या रिक्त जागा किंवा Current Openings विभाग उघडा.
3)कार्यकारी पदांसाठी अर्ज करण्याच्या दुव्यावर क्लिक करा.
4)आवश्यक तपशील भरून अर्ज पूर्ण करा.
5)आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6)अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
अधिक माहितीसाठी तुम्ही IPPB द्वारा प्रकाशित केलेली अधिकृत अधिसूचना PDF स्वरूपात पाहू शकता.
निवड प्रक्रिया कशी होईल?
उमेदवारांची निवड मुख्यत्वे शैक्षणिक पात्रता आणि अर्जाच्या गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. आवश्यक असल्यास, IPPB उमेदवारांसाठी Computer Based परिक्षा घेऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणानंतर त्यांचे नियुक्ती पत्र मिळेल आणि नंतर त्यांची नियुक्ती विविध राज्यांमध्ये केली जाईल.
advertisement
ही संधी सरकारी नोकरीसाठी इच्छुक पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. म्हणूनच इच्छुक उमेदवारांनी 29 ऑक्टोबरपर्यंत IPPB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करण्याची खात्री करावी. या भरतीमुळे भविष्यातील करिअर सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल उचलता येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IPPB Recruitment : सरकारी नोकरीची संधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत बंपर भरती; असा करा अर्ज