Maharashtra New Police DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक, रश्मी शुक्ला यांच्या जागी वर्णी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra New DGP IPS Sanjay Varma : राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत.
मुंबई : राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. सोमवारी, 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं होतं. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांना आदेश दिल्यानंतर त्यांचा पदभार राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला होता.
संजय वर्मा हे राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे ते महासंचालक राहिले आहेत. वर्मा हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय वर्मा हे 2028 मध्ये निवृत्त होणार आहेत. वर्मा यांच्या नावाची कालपासून चर्चा होती.
advertisement
राज्यात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी आघाडीवर होती. अखेर संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली.
शुक्लांच्या नियुक्तीवरुन विरोधक आक्रमक...
रश्मी शुक्ला यांच्यावरून राज्यातलं वातावरण तापलं होतं. काँग्रेसनंतर शिवसेना ठाकरे गटानेही निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून त्यांना हटवण्याची मागणी केली होती. रश्मी शुक्ला यांच्या निष्पक्षपणावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने त्यांना महासंचालक पदावरून हटवावे अशी मागणी निवडणूक आयोगाला केली होती. भाजपच्या आदेशावरून सरकारसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.ॉ
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2024 1:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra New Police DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक, रश्मी शुक्ला यांच्या जागी वर्णी


