विजेच्या धक्क्याने मृत्यू, पाचही जणांची ओळख पटली, बॉडी घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स रस्त्यात बंद पडली!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon: पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असून मृतांची ओळख देखील पटली आहे.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या वरखेडी शिवारात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शेतात लावलेल्या तारांच्या कुंपणात वीज प्रवाह सोडण्यात आलेला होता. या तारांना स्पर्श होऊन विजेचा धक्का लागून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ही घडली होती. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असून मृतांची ओळख देखील पटली आहे.
विकास रामलाल पावरा सोलंकी (वय 30), सुमन विकास पावरा (वय 23), पवन विकास पावरा (वय 4), कतल विकास पावरा (वय 3) आणि विकास पावरा यांची 65 वर्षीय सासू अशी मृतांची नावे असून मृत शेतमजूर कुटुंब हे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार येथील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान मृत कुटुंबांचे नातेवाईक हे मध्य प्रदेशातून जळगावकडे येण्यास निघाले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
मृतदेह नेताना रुग्णवाहिका पडली बंद!
मयत पाच जणांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रवाना केले. मात्र मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने अखेर दुसऱ्या रुग्णवाहिकेला बंद पडलेली रुग्णवाहिका बांधून मृतदेह असलेली रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली. बंद पडलेली रुग्णवाहिका एका खाजगी संस्थेची असल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
August 20, 2025 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विजेच्या धक्क्याने मृत्यू, पाचही जणांची ओळख पटली, बॉडी घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स रस्त्यात बंद पडली!