दारुच्या नशेत तरुण थेट रेल्वे रुळावर झोपला, अंगावरुन मालगाडी गेली आणि घडलं धक्कादायक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सध्या सोशल मीडियाच्या डिजिटल युगामध्ये अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बघितले असतील. अनेक तरुण दारूच्या नशेत काय करतील काही सांगता येत नाही.
नितीन नांदुरकर, जळगाव, 30 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियाच्या डिजिटल युगामध्ये अनेक व्हिडिओ तुम्ही आजवर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बघितले असतील. अनेक तरुण दारूच्या नशेत काय करतील काही सांगता येत नाही. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे घडली आहे. चक्क दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅक वर झोपून राहिला. त्यानंतर त्याच्यावरून मालगाडीचे तीन डबे गेले. तरी देखील या तरुणाला काहीच झाले नाही कोणतीही दुखापत झाली नाही.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावातील मच्छिंद्र गायकवाड हा तरुण मद्यधुंद दारूच्या नशेत आज सकाळीच पाळधी सोनवद रेल्वे गेट याठिकाणी पोहचला. रेल्वे गेटमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा तरुण या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आला होता. दारूच्या नशेत असल्यानं याठिकाणी असलेल्या गेटमनला शंका आली. हा तरुण आत्महत्या करण्यासाठी आला असावा म्हणून गेटमनने तरुणाला हटकले पण हा तरुण जायचे नाव घेत नव्हता. त्याचवेळी एक सुपरफास्ट रेल्वे गेली. तरुणाला थांबवले नसते तर तो जीव देण्यासाठी गेला असता. सुदैवाने गेटमनच्या समय सुचकतेमुळे त्याचे पहिल्यांदा प्राण वाचले. त्यानंतर हा तरुण काही वेळ तिथून निघून गेला.
advertisement
दारुच्या नशेत तरुण थेट रेल्वे रुळावर झोपला, अंगावरुन मालगाडी गेली; जळगावमधील घटनेनं खळबळ#shocking #news18marathi pic.twitter.com/WhFBrITrhJ
— News18Lokmat (@News18lokmat) August 30, 2023
त्यानंतर पुन्हा मालगाडी येत असल्याचं पाहून रेल्वे गेटजवळ येत तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध झोपून राहिला. यावेळी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो उठला नाही. मालवाहू गाडी वेगात असल्यानं तरुणाच्या अंगावरून तीन मालवाहू डब्बे गेले त्यानंतर गाडी थांबवून पुन्हा या तरुणाला बघितले असता सुदैवानं तरुण जिवंत होता. विशेष म्हणजे त्याला कुठलीही दुखापत झालेली नव्हती. त्यानंतर तरुणाला तिथून उचलून बाजूला नेण्यात आलं.
advertisement
गेटमन सुनील आर इसे यांनी दाखवलेल्या समय सुचकतेचे तसेच सतर्कतेचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी सुद्धा झाली होती. नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच झापले, मात्र तरुणाने जमिनीवर झोपून गोंधळ घातला. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2023 12:36 PM IST
मराठी बातम्या/जळगाव/
दारुच्या नशेत तरुण थेट रेल्वे रुळावर झोपला, अंगावरुन मालगाडी गेली आणि घडलं धक्कादायक


