Jalgaon Accident : जळगावात हिट अँड रनचा थरार! घरासमोर उभ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना उडवलं; एक ठार

Last Updated:

Jalgaon Accident : जळगावातील मेहरूण परिसरात कारने घरासमोर उभे राहून गप्पा मारत असलेल्या 5 महिलांना उडवल्याची घटना घडली.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : मेहरुण परिसरातील मंगलपुरी गल्लीत भयानक अपघात घडला आहे. आपल्या घरासमोर उभे राहून गप्पा मारणाऱ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. यात 4 महिला जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे यात एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासही दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान जमावाने कार चालकाला चांगलाच चोप दिला असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कशी घडली घटना?
शोभा रमेश पाटील (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. जळगावातील मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात आज गुरुवारी सायंकाळी काही महिला गप्पा मारीत आपल्या घरासमोर उभ्या होत्या. तर एक महिला रस्त्यावरुन जात होती. त्याचवेळी सायंकाळी साडेसहा वाजता रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार (एम.एच.05 ए.एस 0574) रस्त्याने भरधाव आली. (केसीएन) कारवर चालकाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडविले. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होवू त्यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
त्यांच्यासोबत असलेल्या संगीता प्रकाश महाजन (वय 48), जयश्री जगदीश राऊत (वय 30), सुमनबाई साहेबराव पाटील (वय 65), अर्चना पाटील (वय 40) या जखमी झाल्या. तर दोन लहान मुलं देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली. एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला देखील मार लागला. या घटनेमुळे परिसरातील लोक जमा होवून त्यांनी तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलांपैकी एकीचे पती प्रकाश महाजन यांनी जखमींना अपघातग्रस्त कार मध्येच टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तेथे तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
advertisement
वाचा - जालन्यात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली; 7 भाविक ठार; काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS
दरम्यान, या अपघातातील कारचा चालक पवन कैलास पाटील (वय 25 रा. सप्तशृंगी कॉलनी रामेश्वर कॉलनी मेहरूण जळगाव) हा नवशिक्या असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यावर त्यास पकडून नागरिकांनी जागेवरच चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला घटनास्थळी आलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/जळगाव/
Jalgaon Accident : जळगावात हिट अँड रनचा थरार! घरासमोर उभ्या 5 महिलांसह 2 चिमुरड्यांना उडवलं; एक ठार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement