इमारत कोसळून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू, 5 तासानंतर ढिगाऱ्याखाली सापडली
- Published by:Sayali Zarad
 
Last Updated:
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इमारत कोसळून वृद्ध महिलेचा जीव गेलाय. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
नितीन नांदूरकर, जळगाव, 29 ऑगस्ट : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इमारत कोसळून वृद्ध महिलेचा जीव गेलाय. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. एवढंच नाही तर कोसळलेल्या इमारतीखाली अनेक लोक अडकले होते. समोर आलेली ही घटना जळगावची आहे.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर महाराज नगर मधील जुनी मजली इमारत आज सकाळी कोसळली होती. 4 जण कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. दरम्यान प्रशासनाच्या वतीने तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून राजश्री पाठक या 70 वर्षे वृद्ध महिलेचा ढिगाराखाली अडकून जीव गेला.
advertisement
इमारत कोसळल्यापासून पाच तास या वृद्ध महिलेचा शोध सुरू होता अखेर पाच तासानंतर वृद्ध महिलेला मृत अवस्थेत ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं आहे. वृद्ध महिलेचा मृतदेह बघितल्यावर आजीच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तर जिल्हा रुग्णालयात परिसरात नातेवाईकांसह जळगावकरांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
दरम्यान, इमारत कोसळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिक घाबरलेले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2023 3:16 PM IST


