Nepal Bus Accident : एकाच घरातल्या पाच सदस्यांचा मृत्यू, अंत्यसंस्काराला स्मशानभूमीही पडली अपुरी
- Published by:Priya Lad
Last Updated:
नेपाळमधील बस अपघातात तळवले गावातील 7 जणांचा मृत्यू झाला. यातील 5 जण एकाच कुटुंबातील.
भुसावळ : नेपाळ बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 5 जण एकाच कुटुंबातील आहे. या सगळ्यांचे मृतदेह त्यांचं गाव तळवलेला आणले पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीही अपुरी पडली. स्मशानभूमीचा विस्तार करण्याची वेळ आली.
नेपाळमधील बस अपघातात तळवले गावातील 7 जणांचा मृत्यू झाला. यातील 5 जण एकाच कुटुंबातील. सुहास राणे, सरला राणे, वंदना राणे, सरला तायडे आणि तुळशीदास तायडे अशी त्यांची नावं. तळवले हे सरला तायडे यांचं माहेर. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या मृतदेहावरही इथंच अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातही मृतदेहांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण स्मशानभूमी अपुरी पडत होती. स्मशानभूमीत दोनच ओटे होते. आणखी 5 ओटे वाढवण्यात आले. जेणेकरून सर्व मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करता येतील. गावच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं.
advertisement
नेपाळमध्ये काय घडलं?
महाराष्ट्रातून नेपाळ फिरायला गेलेल्या 104 जणांच्या ग्रूपसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्व लोक महाराष्ट्रातील भुसावळमधील धरणगाव भागातील रहिवासी होते. काठमांडूसाठी 3 बसेस निघाल्या होत्या. पर्यटक बस पोखराच्या रिसॉर्टमधून काठमांडूच्या दिशेने जात होती. या तीन बसपैकी एक बस मर्स्यांगडी नदीत पडली. बसचा नोंदणी क्रमांक UP 53 FT 7623 होता.
advertisement
बसमधून जात असताना अचानक बस 150 मीटर खोल नदीत कोसळली. नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील आयना पहाडा इथे ही दुर्घटना घडली आहे.
महाराष्ट्रातील 27 जणांचा मृत्यू
बसमध्ये चालक आणि कंडक्टरसह 43 जण प्रवास करत होते. सर्व लोक भुसावळमधील धरणगाव भागातील रहिवासी होते. ते नेपाळला पर्यटनासाठी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. पर्यटक बस पोखराच्या रिसॉर्टमधून काठमांडूच्या दिशेने जात होती. भारतीय दूतावासाने ट्विटरवरील एका पोस्ट लिहून माहिती दिली आहे. पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटक बस 43 भारतीयांसह 150 मीटर खाली नदीत पडली.
advertisement
आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. तर एक जण वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित प्रवाशांना वाचवण्यात यश आलं.
सर्व लोक भुसावळमधील धरणगाव भागातील रहिवासी होते. ते नेपाळला पर्यटनासाठी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. सर्वजण गोरखपूरहून बसने निघाले होते.
कसा झाला अपघात?
नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते. नदीजवळच्या खडकावर मृतदेहांचा खच पडला होता. रक्तानं दगड माखले होते. जखमींचा आक्रोश होता. अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
advertisement
मृतांची नावं
view commentsसरला राणे, भारती जावळे, तुळशीराम तायडे, सरिता तायडे, संदीप सरोदे, पल्लवी सरोदे, अनुप सरोदे, गणेश भारंबे, नीलिमा धांडे, पंकज भंगाळे, परि भारंबे, अनिता पाटील, विजया जावळे, रोहिणी जावळे, प्रकाश कोळी, सुधाकर जावळे, सुलभा भारंबे, सुहास राणे, सुभाष रडे, रिंकी राणे, निलीमा जावळे, मुस्तफा मुर्तीजा चालक, रामजी मुन्ना वाहक अशी मृतांची नावे आहेत.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
August 25, 2024 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Nepal Bus Accident : एकाच घरातल्या पाच सदस्यांचा मृत्यू, अंत्यसंस्काराला स्मशानभूमीही पडली अपुरी


