Kalyan Dombivli Non Veg Ban: कल्याण: स्वातंत्र्य दिनी मांसाहार बंदी प्रकरणात नवा ट्वीस्ट! आदेश कोणी काढला? धक्कादायक माहिती समोर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Kalyan News : स्वातंत्र्य दिनी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मांसाहार बंदीचा आदेश प्रशासनाने काढला होता. त्यावर संतापाची लाट उसळली होती.
कल्याण-डोंबिवली: स्वातंत्र्य दिनी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मांसाहार बंदीचा आदेश प्रशासनाने काढला होता. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी काढलेल्या या आदेशावर संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनावर सडकून टीका करत हे आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. आता, या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. या आदेशानुसार, 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
advertisement
जितेंद्र आव्हाडांनी केली होती टीका....
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या या निर्णयावर सडकून टीका केली होती. तुमच्या बापाचे राज्य आहे का? असा संतप्त सवाल करून लोकांनी कधी काय खावे आणि काय विकावे याला कायद्याने काही बंदी दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. मांसाहार हा बहुजन समाजाचा डीएनए आहे. ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी आमचे स्वातंत्र्य हिरावून घेणार का? हा काय तमाशा आहे? अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
advertisement
आदेश कोणी काढले? मासांहार बंदी प्रकरणात नवा ट्वीस्ट...
मासांहार बंदीचा निर्णय प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. स्वातंत्र्य दिनी मांसाहार बंदीचा हा निर्णय आताचा नसल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने 19 डिसेंबर 1988 रोजी अशा प्रकारचा आदेश काढला असल्याची माहिती समोर आली आहे. 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती या आदेशाची प्रत लागली आहे.
advertisement
Kalyan Dombivali News | मटण चिकन बंदीचा निर्णय, KDMC कडून पुरावा | Marathi News
advertisement
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोएल यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाकडून आधीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, 36 वर्षांपूर्वीच्या या जीआरनुसार, गणेश चतुर्थी, महात्मा गांधी जयंती, महावीर जयंती आदी दिवशी मांसाहार बंदी लागू करण्यात आला होता.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
August 12, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Dombivli Non Veg Ban: कल्याण: स्वातंत्र्य दिनी मांसाहार बंदी प्रकरणात नवा ट्वीस्ट! आदेश कोणी काढला? धक्कादायक माहिती समोर