सोलापूर-मुंबईतून प्रवास करणाऱ्यांचे हाल! 30 तासांचा मेगा ब्लॉक; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर 12 ऑक्टोबर 2025 रोजी 30 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला असून वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, सिद्धेश्वर एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: दिवाळीनिमित्ताने तुम्ही प्रवास करणार असाल किंवा विकेण्डला फिरायचा घरी जाण्याचा गावी जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेने कर्जत रेल्वे स्थानकावर 12 ऑक्टोबर 2025 रोजी तब्बल 30 तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे सोलापूरसह दक्षिण भारताच्या दिशेने धावणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
मेगा ब्लॉकमुळे वेळापत्रकात बदल
या ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. 11 ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्या प्रभावित होणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर २०२५ रोजीची मुंबई–सोलापूर–मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच: सोलापूर–मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही गाडी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईपर्यंत न जाता पुण्यापर्यंतच धावणार आहे.
advertisement
30 तास मेगाहाल
या बदलांमुळे सोलापूरहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या आणि मुंबईहून सोलापुरात परतणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागेल. रेल्वे प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावं, असं आवाहन करण्यात येत आहे. 11.10.2025 दुपारी 12.20 वाजल्यापासून ते दिनांक 12.10.2025 संध्याकाळी 06.20 वाजेपर्यंत 30 तासाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे या दरम्यान सर्व ट्रेन बंद राहतील.
advertisement
कर्जत नेरळ सर्व ट्रेन बंद
कर्जत ते नेरळ सर्व ट्रेन बंद, तर कर्जत ते खोपोली सर्व ट्रेन बंद राहतील. ब्लॉक दरम्यान नेरळ ते CSMT लोकल सेवा सुरु राहील. शनिवारी दिनांक 11.10.2025 ब्लॉक पूर्वी शेवटची लोकल कर्जत ते CSMT सकाळी 11:19 ला कर्जत हुन सुटेल. रविवारी दिनांक 12.10.2025 ब्लॉक नंतरची पहिली लोकल कर्जत ते CSMT संध्याकाळी 07.43 ला कर्जत हुन सुटेल.
advertisement
सोमवार दिनांक 13.10.2025 सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 03 तासाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे या दरम्यान सर्व ट्रेन बंद राहतील. मंगळवार दिनांक 14.10.2025 सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 03 तासाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे या दरम्यान सर्व ट्रेन बंद राहतील.
14 ऑक्टोबरलाही विशेष ब्लॉक
view commentsमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून वीकेंडलाच लोकल खोळंबा करणार आहे. मध्य रेल्वे शनिवारी, 11 ऑक्टोबरपासून 30 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. कर्जतहून नेरळ आणि खोपोलीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व लोकल बंद राहणार आहेत. त्यामुळे दिवाळी आधीच्या वीकेंडला खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत. मंगळवारी, 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 3 तासाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे या दरम्यान देखील सर्व ट्रेन बंद राहतील.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 10, 2025 12:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूर-मुंबईतून प्रवास करणाऱ्यांचे हाल! 30 तासांचा मेगा ब्लॉक; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल