Rohit Sharma ची कॅप्टन्सी का काढली? BCCI च्या माजी अध्यक्षांनी सांगितली Inside Story, दादा म्हणतो 'शुभमनसोबत देखील....'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Saurav Ganguly on Rohit Sharma : रोहित खेळत राहू शकतो आणि तोपर्यंत तुम्ही एक तरुण कर्णधार घडवू शकता. त्यामुळे, मला त्यात कोणतीही अडचण दिसत नाही, असं मत सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे.
Rohit Sharma ODI Captaincy : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या वनडे कॅप्टन बदलला आहे. रोहित शर्मा याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेतली अन् युवा खेळाडू शुभमन गिल याला वनडेचा नवा कॅप्टन बनवण्यात आलं आहे. अशातच आता रोहित शर्माला नारळ दिल्याने अनेकांना प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने बीसीसीआयच्या कॅप्टन्सी चेंजचं लॉजिक सांगितलं आहे.
रोहित शर्माचं वय 40 वर्ष
मला वाटतं हा एक योग्य निर्णय आहे. रोहित खेळत राहू शकतो आणि तोपर्यंत तुम्ही एक तरुण कर्णधार घडवू शकता. त्यामुळे, मला त्यात कोणतीही अडचण दिसत नाही, असं मत सौरव गांगुलीने व्यक्त केलं आहे. मला खात्री आहे की, याबद्दल रोहित शर्मासोबत बोलणं झालं असेल. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण 2027 पर्यंत रोहित शर्माचं वय 40 वर्ष असेल. कोणत्याही फॉरमॅटमध्ये 40 वय हे खूप जास्त असतं. शुभमन गिललाही वयाच्या चाळीशीत अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी भविष्यवाणी देखील सौरव गांगुलीने केली आहे.
advertisement
वैयक्तिक कारणे नाहीत - सौरव गांगुली
कॅप्टन्सी नाही पण तो आता किती खेळेल हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. फिटनेस हवी असेल तर प्रत्येक संधीत देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. सतत क्रिकेट खेळत रहावं लागेल. शुभमन गिल युवा खेळाडू आहे. त्याला कॅप्टन बनवायचं असल्याने रोहितला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे, असंही सौरव गांगुली म्हणाला. रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागे वैयक्तिक कारणे नाहीत, असंही सौरव गांगुली म्हणाला.
advertisement
कर्णधारपद नसलं तरी तो...
दरम्यान, रोहित शर्माच नाही तर खेळाडूंच्या कारकिर्दीतील नैसर्गिक बदल आहेत. बीसीसीआय नेहमीच खेळाडूंच्या हिताचा विचार करतं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतं, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. कर्णधारपद नसलं तरी तो एक खेळाडू म्हणून संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. रोहित शर्माला सकारात्मक पद्धतीने विचार करून पुढची पाऊलं टाकावी लागतील, असंही सौरव गांगुली म्हणालाय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 12:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma ची कॅप्टन्सी का काढली? BCCI च्या माजी अध्यक्षांनी सांगितली Inside Story, दादा म्हणतो 'शुभमनसोबत देखील....'