हातपाय दुमडले, पॉलिथीनमध्ये गुंडाळलं, सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळली तरुणी, लातूरमधील भयावह घटना!

Last Updated:

Crime in Latur: वाढवणा-चाकूर रोडवर (Vadhana-Chakur Road) शेळगाव शिवाराजवळील तिरु नदीच्या बाजूला झुडपात एका बॅगेत तरुणीचा मृतदेह आढळला आहे.

News18
News18
लातूर: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढवणा-चाकूर रोडवर (Vadhana-Chakur Road) शेळगाव शिवाराजवळील तिरु नदीच्या बाजूला झुडपात एक बॅग आढळली आहे. या बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृतदेहाची अवस्था पाहता, महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो बॅगेत भरून झुडपात फेकून दिला असावा, अशी दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात लांबपर्यंत दुर्गंधी पसरली होती. यामुळे परिसरातील एका शेतकऱ्याने दुर्गंधी नेमकी कशाची येतेय? याचा शोध घेतला. यावेळी ही भयानक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर चाकूर आणि वाढवणा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
advertisement

आठ महिन्यांतील दुसरी घटना

या घटनेमुळे चाकूर तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे, आठ महिन्यांपूर्वी याच वाढवणा-चाकूर रोडवर हणमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या घटनेतील मृत महिला कोण होती, तिचा खून कोणी केला, याचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. आणि आता पुन्हा याच मार्गावर दुसऱ्या महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement

खुनामागचे कारण काय? पोलिसांचा कसून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस, वाढवणा पोलीस स्टेशनचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथक आणि मोबाईल व्हॅन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेह कोणाचा आहे, या खुनामागचं नेमकं कारण काय आणि मारेकरी कोण आहे? याचा कसून तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हातपाय दुमडले, पॉलिथीनमध्ये गुंडाळलं, सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळली तरुणी, लातूरमधील भयावह घटना!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement