Asia Cup : टी-20 मधल्या नंबर वन बॉलरला डच्चू, सूर्याचा धक्कादायक निर्णय, टीम इंडियाने टॉस जिंकला!

Last Updated:

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमचा सामना यजमान युएईविरुद्ध होत आहे.

टी-20 मधल्या नंबर वन बॉलरला डच्चू, सूर्याचा धक्कादायक निर्णय, टीम इंडियाने टॉस जिंकला!
टी-20 मधल्या नंबर वन बॉलरला डच्चू, सूर्याचा धक्कादायक निर्णय, टीम इंडियाने टॉस जिंकला!
दुबई : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाच्या मोहिमेला सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमचा सामना यजमान युएईविरुद्ध होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाने संजू सॅमसन आणि शुभमन गिल या दोघांनाही संधी दिली आहे, पण आश्चर्यकारकरित्या आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या अर्शदीप सिंगला बाहेर ठेवण्यात आलं आहे. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या तीन स्पिनरसह टीम इंडिया खेळणार आहे.
आशिया कपसाठी शुभमन गिलचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं, याचसोबत गिलला टीमचं उपकर्णधारही बनवण्यात आलं. गिलच्या कमबॅकमुळे ओपनिंगला कोण बॅटिंग करणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, कारण मागचं वर्षभर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टी-20 मध्ये भारतासाठी ओपनिंग केली होती आणि त्यांचं रेकॉर्डही उत्कृष्ट होतं, त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची डोकेदुखी वाढली होती.
advertisement
आशिया कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारतासोबत युएई, पाकिस्तान आणि ओमानच्या टीम आहेत. ग्रुप स्टेजमध्ये 3 पैकी 2 मॅच जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये प्रवेश करणार आहे. युएईविरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून आशिया कपची दणक्यात सुरूवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

टीम इंडियाची प्लेयिंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : टी-20 मधल्या नंबर वन बॉलरला डच्चू, सूर्याचा धक्कादायक निर्णय, टीम इंडियाने टॉस जिंकला!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement