Crime : सहा वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वत:ला संपवलं, असं काय घडलं?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मुलीसोबत घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीला गळफास देत मारले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.
लातूर : लातूर शहरात 35 वर्षीय बापाने 6 वर्षांच्या चिमुकलीसह जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सहा वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून ठार मारले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारस ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर शहरातील अभय भूतडा यांचे 8 वर्षांपूर्वी एका मुलीशी लग्न झाले. त्या दोघांना 6 वर्षांची मुलगी आहे. अभय हे सध्या सासरवाडीतच रहायला होते. तसंच त्यांनी मोतीनगर भागात घर भाड्याने घेतलं होतं. अभय भूतडा हे मार्केट यार्ड परिसरात हॉटेल व्यवसाय करत होते.
अभय भूतडा हे बुधवारी सकाळी मुलीला शाळेत सोडतो सांगून हॉटेलमधून निघाले होते. मुलीला शाळेत सोडल्यानंतर पुन्हा काही वेळाने मुलीला आणण्यासाठी गेले. वडील असल्याने शिक्षकांनीही मुलगी नव्याला त्यांच्याकडे सोपवले. दरम्यान, अभय भूतडा हे सासरवाडीत न जाता मोतीनगर इथल्या भाड्याच्या घरी गेले. मुलीला इडली घेऊन देतो म्हणत डब्यात इडलीसुद्धा घेतली होती.
advertisement
मुलीसोबत घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीला गळफास देत मारले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. अभय भूतडा यांना त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांनी आर्थिक मदत केली होती. त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. हॉटेल व्यवसाय सुरू केला पण त्यातही म्हणावं तितकं उत्पन्न मिळत नव्हतं. ते कर्जबाजारी झाले होते. गेल्या 6 महिन्यांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. शेवटी त्यांनी 6 वर्षांच्या चिमुकलीसह स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2024 8:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Crime : सहा वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वत:ला संपवलं, असं काय घडलं?










